corona vaccination
corona vaccination sakal media
पुणे

विद्यार्थ्यांच्या कोरोना लसीकरणात जिल्ह्यातील ग्रामीण भागाने घेतली आघाडी

सकाळ वृत्तसेवा

पालकमंत्री पवार यांनी शनिवारी शहर व जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतला.

पुणे - शहर व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या (Student) (१५ ते १७ वयोगट) कोरोना लसीकरणात (Corona Vaccination) जिल्ह्यातील ग्रामीण भागाने (Rural Area) आघाडी घेत, लसीकरणासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ८० टक्के विद्यार्थ्यांना कोरोनाचा पहिला डोस (Dose) दिला आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत पुणे शहरातील विद्यार्थ्यांचे लसीकरण खुपच प्रमाणात पूर्ण झाले आहे. त्यामुळे पहिल्यांदा पुण्यातील पात्र विद्यार्थ्यांच्या कोरोना लसीकरणाचा वेग वाढवा, ज्येष्ठांना बूस्टर डोस द्या आणि खासगी कंपन्यांमधील सर्व कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस पूर्ण करा, असा आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. २२) दिला.

पालकमंत्री पवार यांनी शनिवारी शहर व जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतला. या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोरोना प्रतिबंधासाठी करावयाच्या संभाव्य उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करताना हा आदेश दिला. पुणे शहरातील अधिकाधिक कोरोना रुग्ण घरच्या घरीच उपचार घेत असले तरी, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन कोविड केअर सेंटरमधील यंत्रणा आतापासूनच सज्ज ठेवावी. कोरोना रुग्णांना उपचारासाठी त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शहर व जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्येही कोरोना रुग्णांवर उपचार सुरु करण्याची सोय उपलब्ध करून द्यावी. याबाबत संबंधित रुग्णालयांना तशा सूचना द्याव्यात. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध खाटांच्या योग्य नियोजनाकडे लक्ष द्यावे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार वंदना चव्हाण, विभागीय आयुक्त सौरभ राव,जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदींसह शहर व जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते.

विभागीय आयुक्त राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोरोना संसर्ग परिस्थितीची माहिती दिली. पुणे जिल्ह्यात मागील आठवड्याच्या तुलनेत सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत ३२ हजार ९२२ ने वाढ झाली आहे. १५ ते १८ वयोगटातील ५१ टक्के मुलांचे पाहिल्या मात्रेचे लसीकरण पूर्ण झाले आहे. पुणे शहरात रक्षक नगर येथील क्रीडा संकुलात २७५ खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असल्याचे राव यांनी सांगितले.

या बैठकीपूर्वी पवार यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष कांचन यांनी हवेली तालुक्यातील उरुळी कांचन गावासाठी दिलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. उरुळी कांचन येथील श्री प्रयागधाम ट्रस्टतर्फे शहरातील गरीब नागरिकांसाठी ३०० कांबळी (चादरी) भेट देण्यात आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प; CSMT स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला

SCROLL FOR NEXT