Panchnama Sakal
पुणे

पुन्हा एकदा हॅपी बर्थडे

सु. ल. खुटवड

‘‘हल्ली तुमचं माझ्यावर प्रेमच राहिलं नाही.’’ मानसीने हे वाक्य उच्चारताच नितीनच्या पोटात गोळा आला. त्याने घाबरतच कशावरून? काय झालं?’’ असं विचारले. मग मानसी गाल फुगवून, फुरंगटून बसत म्हणाली, ‘‘लग्न झाल्यानंतर सुरुवातीला आपण एकत्र जेवायचो. तुम्ही तुमच्या ताटातील एक घास मला भरवायचे, नंतर स्वत: एक घास खायचे, असं आपलं जेवण चालायचं. कधी-कधी तर तुम्ही एकही घास खायचे नाही. पण मला भरवायचे. आता करता का तसं? प्रेमानं मला भरवलंय का कधी? मानसीने विचारले. त्यावर नितीन म्हणाला, ‘‘अगं नवीन नवरी म्हणून तू आली होतीस ना, त्यावेळी तुला स्वयंपाक नीट जमत नव्हता. त्यामुळे माझ्या ताटात वाढलेलं तुला मी भरवायचो. आता तू स्वयंपाक त्यामानाने खूप चांगला करतेस. त्यामुळे मी तसं करत नाही.’’ असं म्हणून नितीनने जीभ चावली. पण मानसीच्या ध्यानात हा टोमणा न आल्याने त्याने नि: श्वास सोडला.

मानसी म्हणाली, ‘‘उद्या माझा वाढदिवस आहे. मला काहीही प्रेझेंट नकोय. फक्त पूर्वीसारखं एका ताटात आपण जेवायला बसायचं अन् तुम्ही मला तुमच्या हाताने भरवायचं. मान्य आहे.?’’ मानसीने असं विचारल्यावर नितीनने होकार दिला. ‘‘अगं उद्या घरकामातून तुला सुटी घे. इकडची काडी, तिकडे करायची नाहीस. उद्या मी आॅफिसमधून लवकर घरी येतो. पावभाजी व पुलाव मी स्वत: करतो. त्यानंतर तुला प्रेमाने भरवतो. फरशी वगैरे पुसून भांडीही घासतो. तू फक्त हुकूम सोडायचा.’’ नितीनने खुशीत आश्वासन देऊन टाकले.

‘‘सकाळी लवकर उठून नितीनने झटपट सगळं आवरलं. मानसीला चहा-नाश्ता देऊन, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नवऱ्याच्या आपुलकीच्या वागण्याने मानसी सुखावली. सगळं घरकाम करून नितीन आॅफिसला पोचला. सायंकाळी तो लवकरच घरी पोचला व स्वयंपाकाची तयारी करू लागला. नेमकं त्याचवेळी गावावरून नितीनचे आई-वडील कितीतरी महिन्यांनी आले. सासू- सासरे आल्याचे बघताच मानसी लगबगीने किचनमध्ये गेली व ‘मी करते स्वयंपाक, तुम्ही बाहेर बसा’, असे म्हणू लागली. पण, नितीनने तिचे काही ऐकले नाही. नऊ वाजता नितीनने आई-वडिलांना वाढलं. जेवणानंतर आई- वडील हाॅलमध्ये टीव्ही पहात बसले. साडेनऊच्या सुमारास नितीनने एकच ताट केलं व ते घेऊन हाॅलमध्ये आला व मानसीला शेजारी बसवले. ‘‘तुम्ही जेवा. मी नंतर जेवते,’’ असं मानसीने म्हटलं; पण नितीननं अजिबात ऐकलं नाही. तिला घास भरवू लागला. पण, सासू-सासरे सोफ्यावर बसलेत आणि त्यांच्यासमोर नवरा आपल्याला घास भरवतोय, हे पाहून ती कमालीची लाजली.’’

अहो... नको... मी जेवते माझ्या हाताने.. असं म्हणू लागली. पण, नितीनने त्याला विरोध केला. ‘‘तुझीच इच्छा मी पूर्ण करतोय ना.’’ असं म्हणून तो मानसीला घास भरवू लागला. ती मात्र लाजून गेली. जेवणानंतर नितीनने सर्व खरकटे काढली. फरशी पुसली आणि भांडीही घासली. ‘‘मी तुला दिलेला शब्द पाळला की नाही. पुन्हा एकदा हॅपी बर्थडे.’’ नितीनने हसत-हसत म्हटले. मात्र सासू- सासऱ्यांसमोर घडलेल्या या प्रकारामुळे ती संकोचून गेली होती. अकराच्या सुमारास दोघे बेडरुममध्ये गेली. त्यावेळी नितीनच्या आई-वडिलांनी हाॅलमध्ये अंथरुन घातले. ‘‘काय यांची नाही ती थेरं,’’ असं म्हणून नितीनच्या आईने नाक मुरडले. तर त्याचे वडील म्हणाले, ‘‘मी तुला सांगत होतो, लग्नानंतर नितीन निव्वळ नंदीबैलासारखा वागतोय. स्वत:च्या डोळ्यांनी बघितलंस म्हणून तुला आता खरं वाटलं.’’ असं म्हणून शेजारच्या बॉक्समधील बाकरवडी व सोनपापडी ते बायकोला भरवू लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवली

SCROLL FOR NEXT