sachin kothmire1.jpg 
पुणे

शिपाई काकांनी दिला निराधार महिलांना मदतीचा हात

अजित घस्ते

सहकारनगर (पुणे) : कोरोना महामारीच्या काळात सामाजिक बांधिलकी म्हणून बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील चतुर्थ श्रेणी मधील शिपाई सचिन कोथमिरे काका यांनी मासिक वेतनातून गुलटेकडी येथील ङायसप्लाॅट झोपडपट्टी, ढोलेमळा, खिलारेवस्ती मधील निराधार गोरगरीब, विधवा, दुर्बल घटकातील वीस महिलांना घरखर्चासाठी प्रत्येकी पाचशे रुपये अशी दहा हजाराची आर्थिक मदत केली.

याबाबत कोथमिरे काक म्हणाले, महापालिकेत शिपाई म्हणून काम करीत असताना गेले तीन महिने झाले कोरोनाच्या या महामारीमध्ये झोपडपट्टीतील गोरगरीब हातावरच्या पोट असणाऱ्या निराधार विधवा महिलांचे काम नसल्याने हाल होत आहे. सोसायटीमध्ये घरकाम करण्यासाठी बंधन येत आहे. म्हणून खऱ्या अर्थाने घरकाम करणाऱ्या महिलांच्या कुटुंबावर उपसमारीची वेळ येत होती. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत 'फुल ना फुलाची पाकळी' म्हणून माझ्या वेतनातून झोपडपट्टीतील निराधार महिलांना मदत केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लाॅकडाउनमुळे हातावरचे असलेल्यांचे सध्या खूप हाल होत आहेत. परंतु कोथमिरे काकांसारखे अनेक लोक सध्या दुर्बल घटकांच्या मदतीला धावून येत आहेत. त्यामुळे समाजात माणुसकी जपली जात आहे, याचे चित्र अनेक घटनांमधून दिसून येते. प्रत्येक जण आपापल्या परीने सामाजिक बांधिलकी जपत आहे. कोथमिरे काकांच्या कार्याचे त्यांच्या परिसरात कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! युद्ध सुरू झाल्यापासून सोनं 17% कोसळलं; आजचा भाव किती?

Vardha News: लोकप्रतिनिधींना जमले नाही, ते शेतकऱ्यांनी करून दाखविले; प्रशासनाला दाखविला आरसा, ३० वर्षांनतर हिवरा-पिपरा पांदण रस्त्यावर धावली चारचाकी

MS Dhoni ruled out: महेंद्रसिंग धोनी दोन आठवड्यांसाठी IPL 2026 मधून बाहेर; CSK ला पहिल्या सामन्याआधी मोठा धक्का

Illegal Infant Disposal Case : आक्काताई लावत होती मृत अर्भकाची विल्हेवाट, नातेवाईकांनी नकार दिल्यास थेट उघड्यावर अर्भक फेकायचे; पेशंटचीही होणार चौकशी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो रिक्षासाठी LPGचा पुरवठा कमी

SCROLL FOR NEXT