साधना बँक sakal
पुणे

साधना बँकेकडून 'श्री शरद पवार गुणवंत कन्यारत्न' पुरस्काराची घोषणा

सभासदांच्या दहावी व बारावीतील गुणवंत कन्येला दिला जाणार रोख रकमेचा पुरस्कार

कृष्णकांत कोबल

हडपसर : साधना सहकारी बँकेच्या वतीने सभासदांच्या इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत कन्यांना 'श्री शरद पवार गुणवंत कन्यारत्न' पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसापासून दरवर्षी हा पुरस्कार दिला जाणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अनिल तुपे यांनी दिली.

खासदार पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी साधना बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेतला. महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, साधना बँकेचे सुकाणू समिती सदस्य व आमदार चेतन तुपे, सुकाणू समिती सदस्य तसेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप तुपे, चेअरमन अनिल तुपे, ज्येष्ठ संचालक चंद्रकांत कवडे, कार्यालक्षी संचालक भाऊ तुपे आदी यावेळी उपस्थित होते.

साधना सहकारी बँक गेली अनेक वर्षे सभासदांच्या दहावी व बारावीतील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत पाल्यांना रोख रक्कम दोन हजार रुपये देऊन गौरव करत आहे. तो उपक्रम कायम ठेवून येत्या १२ डिसेंबर पासून बँकेच्या सभासदांच्या सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या दहावीतील दोन व बारावीतील तीन असा पाच विद्यार्थीनींना 'श्री शरद पवार गुणवंत कन्यारत्न' पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहे. प्रत्येकी पाच हजार रुपये रोख रक्कम स्वरूपात हा पुरस्कार असल्याचे चेअरमन तुपे यांनी सांगितले.

पवार साहेबांना साधना बँकेने दिला वीस हजारांचा धनादेश

खासदार पवार हे साधना सहकारी बँकेचे मान्यवर सभासद आहेत. बँकेच्या सभासदाला एकच अपत्य असल्यास साधना बँक त्या सभासदाला दहा हजार रुपये देऊन सन्मानित करते तर, एकच कन्या अपत्य असलेल्या सभासदाला वीस हजार रुपये देऊन 'साधना कन्यारत्न' पुरस्काराने गौरव करते. आतापर्यंत सुमारे ४० सभासद यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. बँकेचे मान्यवर सभासद असलेले खासदार शरद पवार यांनाही एकच कन्या असल्याने त्यांना आज त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन पुरस्काराचा वीस हजारांचा हा धनादेश देण्यात आला.

बँकेने तो शद्ब पाळला

साधना बँकेच्या मुख्य शाखेच्या कार्यालयाचे उद्घाटन खासदार शरद पवार यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्यावेळी बँकेच्या सभासदाला एका अपत्यासाठी देण्यात येणाऱ्या 'साधना कन्यारत्न 'चे त्यांनी कौतुक केले. आपणही सभासद असून या योजनेस पात्र असतानाही बँकेने मला त्याचा लाभ दिला नाही, असे पवार मिश्कीलपणे बोलले होते. हे लक्षात घेऊन संचालकांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन 'साधना कन्यारत्न ' चा वीस हजार रुपयांचा धनादेश त्यांना दिला. त्यांनीही तो स्विकारल्याने संचालकांनी आनंद व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत आंदोलन करणं CJPला महागात पडलं! अभिजीत दिपकेंसह सर्व आंदोलकांवर गुन्हा दाखल, पोलिसांची कडक कारवाई

Sarva Pitri Amavasya 2026: यंदा सर्वपित्री अमावस्या कधी आहे? जाणून घ्या शुभ तिथी, तर्पण मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

हल्लेखोर को-पायलटचं नाव समोर, ओमानमध्ये घातलेली बंदी; कट्टरपंथी विचारसरणीचा असल्याचंही उघड

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Gold Silver Prices : पितृपक्षामुळे सोने-चांदीची 'झळाळी' पडली फिकी; ग्राहकांची खरेदीकडे पाठ, आता विजयादशमीची आशा, जाणून घ्या दर

SCROLL FOR NEXT