चित्रबलाक  sakal
पुणे

कच्छच्या रणातल्या सैबेरीयन चित्रबलाक पक्ष्यांचे इंदापूरात सारंगगार

दरवर्षी डिसेंम्बर महिन्याच्या शेवटी येणारे हे पक्षी यंदा फेब्रुवारीच्या शेवटच्या महिन्यात आले आहेत.

डॉ. संदेश शहा

इंदापूर : इंदापूर येथील जुन्या तहसिल कार्यालय प्रांगणातील चिंचेच्या झाडावर आपलेसारंगगार फुलविण्यासाठी कच्छच्या रणातून सैबेरीयन पक्षी अशी ओळख असलेल्या चित्रबलाक पक्षाचे आगमन झाले. दरवर्षी डिसेंम्बर महिन्याच्या शेवटी येणारे हे पक्षी यंदा फेब्रुवारीच्या शेवटच्या महिन्यात आले आहेत. त्यांनी आपले सारंगगार फुलविण्याससुरुवात केली आहे. शेकडोंच्या संख्येने आलेले हे पक्षी जून मध्ये असताना हजारोंच्या संख्येने जातात.

गेली ५२ वर्ष हे चित्रबलाक पक्षी अव्याहत पणे इंदापूर ला येत आहेत. जुने तहसिल कार्यालय हे इंदापूर शहरात छत्रपती मालोजी राजे यांच्या गढीत असून हे उंचावर ठिकाण आहे. त्यामुळे चित्रबलाक पक्षास आपले गोकुळ फुलविण्यास नैसर्गिक संरक्षण मिळते .त्यातच जवळ उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्र असल्याने त्यांना अन्न म्हणून मासे व शेवाळ मुबलक प्रमाणात मिळतात. त्यामुळे त्यांचा अन्नाचा प्रश्न मिटला. आकर्षक लाल रंगाची चोच, आकर्षक शरीर रचना व डौलदार चालणे हे या पक्षांचे वैशिष्ट्य आहे.आकाशा तील त्यांचा बहुसंख्येने विहार आबालवृद्ध नागरिकांचे लक्ष्य वेधून घेतो. हे पक्ष्यांचा इतर कुठल्याही पक्ष्यास त्रास नाही. त्यामुळे अनेक पक्षी इंदापूर परिसरात माळवाडी नंबर दोन, वडापुरी येथील थोरात वस्ती, सणसर

बंगला परिसरात त्यांची वस्ती असते. त्यामुळे अनेक पक्षी या वातावरणात रममाण झाले असून ते स्थानिक रहिवासी झाले आहेत. दरवर्षी या पक्षांचा अभ्यास करण्यासाठी मुंबई, पुणे, सोलापूर व नगर येथून पक्षी अभ्यासक मोठ्या प्रमाणात येतात. पक्षीमित्र

अरविंद कुंभार, डॉ. संजय चाकणे, डॉ. राजेंद्र साळुंखे, डॉ. जीवन सरवदे, डॉ. भास्कर गटकुळ, डॉ. निनाद शहा, ऍड. समीरण पोळ, डॉ. संजय शिंदे, राहुल लोणकर, ऍड सचिन राऊत यांच्यामुळे या पक्षाची माहिती अनेक नागरिकांपर्यंतपोहोचली आहे. त्यामुळे राज्य, देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक जण या पक्षाच्या जीवन चर्येचा अभ्यास करण्यासाठी इंदापुरला येतात ,मात्र त्यांच्यासाठी स्वतंत्र गेस्ट हाऊस ची सुविधा होणे गरजेचे आहे.

छत्रपती मालोजीराजे यांच्या गढीतील तहसिल कार्यालय नवीन जागेत गेले आहे. त्यामुळे इंदापूर शहराचे ऐतिहासिक महत्त्व अबाधीत ठेवण्यासाठी या गढीत चित्रबलाक पक्षी निरीक्षण केंद्रासह शिवसुष्ट्री उभा करावी अशी तमाम शिवप्रेमींनी खासदार सुप्रिया सुळे, सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील ,नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्याकडे मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT