Sakal Impact Appointment of Medical Officer on temporary basis pune Sakal
पुणे

Sakal Impact : तात्पुरत्या स्वरुपात वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती

साईनगरमधील माता रमाई आंबेडकर महापालिकेच्या दवाखान्यात महिनाभरापासून वैद्यकीय अधिकारीच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते.

सकाळ वृत्तसेवा

कोंढवा : साईनगरमधील माता रमाई आंबेडकर महापालिकेच्या दवाखान्यात महिनाभरापासून वैद्यकीय अधिकारीच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते. त्यानंतर सकाळने वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी रुग्णांची गैरसोय या मथळ्याखाली वृत्त छापल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून याची दखल घेत वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.

पंरतु, ती नियुक्ती तात्पुरत्या स्वरुपाची असून १५ एप्रिलपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा काही दिवसांनंतर दवाखान्यावर वैद्यकीय अधिकारी नसण्याची वेळ येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सदरील नियुक्ती ही सद्यस्थितीत तात्पुरत्या स्वरुपाची असली तरी नियुक्त केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आधीच्या ठिकाणांवरुन पदमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे साईनगरच्या दवाखान्यात ते वैद्यकीय अधिकारी पुढे कायम असतील, त्यामुळे नागरिकांनी चिंता करु नये.

- भगवान पवार, मुख्य आरोग्य अधिकारी, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News : एक ट्रक उलटला, पाठीमागून ४ ट्रक, एक बस आणि कारने धडक दिली; दोघांचा मृत्यू, १६ जण जखमी

RTE Admission 2026: खाजगी शाळांमध्ये मोफत शिक्षणासाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार; मुलांचे वय किती असावे? वाचा सविस्तर माहिती

Thackeray Brothers Alliance : जागावाटप पूर्ण, कोणत्याही क्षणी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा; राजकीय घडामोडींना वेग, महत्त्वाची अपडेट समोर...

किशोरी शहाणेची खास आहे लव्हस्टोरी! कसं झालं नावाजलेल्या दिग्दर्शकासोबत लग्न? बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याने केलेली मध्यस्थी

Google 67 Search Meme : गुगलवर 67 सर्च करताच का हलू लागते स्क्रीन ? एकदा ट्राय तर करुन बघा; मजेशीर आहे Word of Year कहाणी

SCROLL FOR NEXT