Sakal 
पुणे

'सकाळ'ची वाचकसंख्या वाढली तब्बल 11.89 लाखांनी! 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : इंडियन रीडरशिप सर्व्हेच्या (आयआरएस) ताज्या अहवालानुसार "सकाळ'ने वाचकसंख्येत तब्बल 11.89 लाखांची वाढ नोंदविली आहे. "सकाळ'ची एकूण वाचकसंख्या आता 1 कोटी 39 लाख 60 हजारांवर पोचली आहे. "सकाळ'ची वाचकसंख्येतील वाढ 9.3 टक्के आहे. 

पुणे जिल्ह्यात "सकाळ'ने 41.23 लाख एकूण वाचकसंख्येसह निर्विवाद अव्वल स्थान कायम ठेवले आहे. "आयआरएस'मध्ये पुणे जिल्हा क्षेत्रात पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांसह जिल्ह्याचा समावेश होतो. 

यापूर्वी एप्रिल 2019 मध्ये जाहीर झालेल्या ऑडिट ब्यूरो सर्क्‍युलेशनच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील मराठी दैनिकांच्या खपात "सकाळ' पहिल्या स्थानावर असून, "सकाळ'चा खप 12 लाख 92 हजार इतका नोंदवला होता. 

सामाजिक-आर्थिक दर्जानुसार होणाऱ्या वर्गवारीमध्ये (National Consumer Classification System - NCCS) अति उच्च दर्जाच्या किंवा "एनसीसीएस-ए1' श्रेणीत "सकाळ'ने महाराष्ट्रात 9.07 लाख एकूण वाचकसंख्या नोंदविली आहे. महाराष्ट्रात "एनसीसीएस-ए1' श्रेणीत एकूण वाचकसंख्येत मराठी दैनिकांमध्ये "सकाळ' पहिल्या क्रमांकावर आहे. 

कोणतीही सेवा अथवा उत्पादने यांच्या जाहिरातींसाठी वाचकांची सामाजिक-आर्थिक वर्गवारी अत्यंत महवाचा घटक मानला जातो. "सकाळ'च्या सरासरी वाचकांच्या एकूण संख्येपैकी पन्नास टक्के वाचक अतीउच्च दर्जाचे किंवा "एनसीसीएस-ए' या श्रेणीतील आहेत. 

पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण झालेले 31.52 लाख (एकूण वाचकसंख्या) वाचक "सकाळ' वाचतात, असे ताज्या सर्वेक्षण अहवालात स्पष्ट झाले. याचाच अर्थ उच्चशिक्षित वर्गामध्ये "सकाळ' लोकप्रिय आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT