pune satara road.jpg
pune satara road.jpg 
पुणे

शेताजवळच उपलब्ध झाला बाजार पण...

किरण बधे

नसरापूर (पुणे) : पुणे-सातारा महामार्गावर थाटलेल्या भाजीपाला बाजारामुळे शेतकऱ्यांना चांगला आधार मिळाला असून ग्राहकांना ताजी भाजी तर शेतकऱ्यांना शेताजवळच मार्केट उपलब्ध झाले आहे. 
पुणे-सातारा महामार्गावरील भोर तालुक्‍यातील शिवरे, वरवे, केळवडे, साळवडे, कांजळे, खोपी या गावामधील शेतकऱ्यांनी शेताला लागूनच असलेल्या महामार्गावरील सेवा रस्त्यावर विक्रीस सुरवात केली आहे. सेवा रस्त्यावर हा बाजार चांगला भरत आहे.

शेतामधील ताजी काकडी, भेंडी, घेवडा, पालेभाज्या, वाटाणा, कांदे, कोथिंबीर आदी भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून मिळत असल्याने महामार्गावरील ग्राहक देखिल या ठिकाणी आवर्जून भाजी घेत आहेत. भाजीपाल्या बरोबर या भागातील सीताफळ, अंजीर, पेरू, केळी, डाळिंब ही फळे देखिल या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे. 


या ठिकाणी थेट विक्री करता येत असल्याने शेतकऱ्यांना थेट फायदा होत आहे. लॉकडाउनच्या कालावधीत झालेला तोटा यामुळे भरून निघत आहे. 
- दीपक यादव, तरुण शेतकरी 


शेतातील उत्पादन मार्केटला नेण्यासाठी वाहतूक खर्च लागत नाही. मध्ये दलाल नाहीत. यामुळे शेतकरी या ठिकाणी विक्रीस पसंती देत आहेत व ग्राहकांना देखील चांगल्या दर्जाचा भाजीपाला मिळत आहे. 
- दत्तात्रय भोरडे, शेतकरी 

सुरक्षा महत्त्वाची 
महामार्गावर भाजीपाला विक्री करताना शेतकऱ्यांनी व ती घेताना प्रवासी ग्राहकांनी सुरक्षितता पाळणे गरजेचे आहे. खरेदी करण्यासाठी गाडी थांबविताना ती वाहतुकीस कोणताही अडथळा होणार नाही, तसेच अपघात होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांनी रस्त्यावरून ये-जा करताना भरधाव वाहनांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा हा बाजार म्हणजे अपघातासाठी निमंत्रण देणारा ठरू शकतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT