smbahji-maharaj.jpg 
पुणे

पुणे : 'कोरोनाची लढाई छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेरणेने लढूया'

सकाळवृत्तसेवा

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने आज पुण्यातील डेक्कन भागातील राजेंच्या पुतळ्याला महापौर आणि अनेक संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आलं. महापौर मुरलीधर मोहोळ, विकास पासलकर, प्रशांत धुमाळ यावेळी उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करत जयंती साजरी करण्यात आली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी सर्वांनी शपथ घेत कोरोनाची लढाई छत्रपतींच्या प्रेरणेने लढूया, असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी पासलकर म्हणाले, ''संभाजी महाराजांची जयंती आम्ही केली. आम्ही आमची परंपरा कोरोनाच्या संकटात सगळे निकष व काळजी घेऊन पार पाडले. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून गेली १७ वर्ष जयंती महोत्सव साजरा करत आहोत, याचा आनंद व अभिमान वाटतो.'' 

पुढे पासलकर म्हणाले, या प्रसंगी कोरोनाच्या विरुद्ध लढताना आमच्या सर्व तरुणांना छत्रपती संभाजी राजेंच्या शौर्य व पराक्रमातून प्रेरणा मिळते, हा जाज्वल्य इतिहास आम्हाला संकटकाळात लढण्याचे बळ देतो. छत्रपतींचा शौर्याचा व पराक्रमाचा इतिहास आम्ही आजच्या तरुणांपर्यंत पोचवला पाहिजे प्रशांत धुमाळ, त्यांचे सर्वं टीम विराज तावरे, मंदार बहिरट, प्रदीप व सर्वच पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचे चांगले नियोजन केले.

डेक्कन येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी या वर्षी महापौर मुरलीधर मोहळ, उपमहापौर शेडगे, पुणे क्षेत्रीय आयुक्त संदीप कदम आदी उपस्थित होते. या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे नेते विकास पासलकर यांच्या हस्ते सर्वांचा सन्मान करण्यात आला. काही मोजक्या मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.

या प्रसंगी सर्वांनी शपथ घेत सांगितले की, या वर्षी पुरंदर किल्यावर जायला जमले नाही. चुकल्यासारखे वाटत आहे. परंतू पुढील वर्षी या कोरोनाला हरवून मोठी जयंती साजरी करूयात. संभाजी महाराज जयंती १८ वर्षापुर्वी पुणे शहर व पुरंदर किल्यावर ज्या काळात व ज्या अडचणींवर मात करून सुरू केली होती, त्याला आता लोकउत्सवाचे स्वरूप आले आहे याचा मनस्वी आनंद होत असल्याचेही पासलकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: एकमेकांवरील हल्ले अजूनही सुरूच; मृतांची संख्या चौदाशेहून अधिक, इराणमध्ये मोठे नुकसान

Jyoti Waghmare : राज्यसभेवर जाणाऱ्या ज्योती वाघमारे ठरल्या सोलापूर जिल्ह्यातील तिसऱ्या नेत्या; यापूर्वी कोणाला मिळाली होती संधी? एकनाथ शिंदेंचा 'मास्टरस्ट्रोक' चर्चेत!

Missile Attack Crude Oil Tanker : इस्त्राईल-इराण युद्धात क्रूड ऑईल जहाजावर क्षेपणास्त्र हल्‍ला, कोल्हापूरचा रोहित पाटील जहाजात; अनेकांना बहरीनमध्ये हलवलं

IND vs NZ Final: ७ सामन्यांत १२.७१ ची सरासरी अन् ८९ धावा! अभिषेक शर्मा OUT, रिंकू सिंग IN? वर्ल्ड कप फायनलसाठी भारताच्या Playing XI मध्ये दोन बदल अपेक्षित

Sukhoi Fighter Jet Crash : 'Purvesh Is No More..'! कॅप्टनचे ते शब्द ऐकताच पूर्वेशच्या वडिलांवर मोठा आघात; म्हणाले, 'छत्रपती शिवरायांचा त्याच्यावर..'

SCROLL FOR NEXT