PDE26B04935
पांडे ः मूकबधीर विद्यालयत धर्मवीर छत्रपती शंभुराजे यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त खाऊ वाटप करताना डॉ. रोहन पाटील आदी.
मूकबधीर विद्यालयात खाऊ, शालेय साहित्याचे वाटप
पांडे ः देवीचामाळ येथे मूकबधीर विद्यालयत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. कमलाभवानी संस्था आणि राजमुद्रा ग्रुप यांच्या विद्यमानाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यआभिषेक दिनानिमित्त मुकबधीर विद्यालयत डॉ. रोहन जाधव पाटील यांच्या हस्ते शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले होते. डॉ. शिवानी पाटील, अभिजित पाटील, सचिन गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम करण्यात आला होता. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजिंक्य जाधव, राहुल जाधव, अजय खंडागळे, सतीश फंड, शेखर इंदुरे, सूरज बागडे, गणेश इंदुरे, सोपान साबळे, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.