lohgaon airport
lohgaon airport sakal
पुणे

कुर्सी की पेटी बांध लो... एअरपोर्ट ‘हवेत’ आहे!

संभाजी पाटील @psambhajisakal

एखाद्या शहराच्या विकासाचे परिमाण हे त्या शहरातील दळणवळणाच्या साधनांची उपलब्धता कशी आहे यावरून ठरवले जाते.

एखाद्या शहराच्या विकासाचे परिमाण हे त्या शहरातील दळणवळणाच्या साधनांची उपलब्धता कशी आहे यावरून ठरवले जाते. जग विविध अत्याधुनिक साधनांमुळे एवढे जवळ आले आहे की, आता कोणतीही स्पर्धा ही जागतिक स्तरावरच होते. त्यामुळे पुण्याची तुलना मुंबई किंवा अहमदाबादशी करून चालणार नाही तर जगात जी काही महानगरे आहेत किंवा विकसित होत आहेत त्यांच्या तुलनेत आपण कुठे आहोत, असाच विचार व्हायला हवा. पुण्याने स्वकर्तृत्वाने जागतिक पातळीवर नाव तयार केले खरे पण इथल्या नेतृत्वाची साथ, व्हीजन वा नवे काही करण्याची उमेद कधीच दिसली नाही, त्यामुळेच एक आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठीची प्रगती सोळा वर्षांनंतरही शून्यावर आहे.

फक्त चर्चा आणि राजकारण

पुणे शहर आणि जिल्ह्यात अनेक दिग्गज आहेत, त्यांचा देश पातळीवर मोठा दबदबा आहे. राज्याच्या राजकारणावरही प्रभुत्व आहे, असे असतानाही राजकारणापलीकडे जाऊन संपूर्ण शहर आणि परिसराचा विचार करून विमानतळ व्हावा यासाठीची राजकीय इच्छाशक्ती दिसून आली नाही. पुण्याच्या बाबतीत हे वारंवार घडलेले दिसते. त्याचमुळे इथला एकही प्रकल्प वेळेवर पूर्ण होऊ शकलेला नाही. त्याचे तोटे या शहराला आणि या शहरावर अवलंबून असलेल्या लाखो नागरिकांना बसलेले दिसतात. प्रगत देशांमध्ये प्रमुख शहरांमध्ये दोन किंवा तीन विमानतळ आहेत. आपल्याकडे जागेची टंचाई आहे, ती यापुढील काळातही आणखी गंभीर होणार आहे, म्हणून विमानतळाचा विचारच करायचा नाही, हे योग्य नाही. पुणे विमानतळाच्या बाबतीत तर राजकारण नडले हाच एकमेव निष्कर्ष निघतो.

जनमानसाच्या भावनांचा सन्मान नाही

पुण्याला स्वतंत्र विमानतळ हवे याची चर्चा तीस वर्षांपासून सुरू आहे. मात्र, या प्रकल्पाच्या बाजूने खमकेपणाने एकही नेता, पक्ष, लोकप्रतिनिधी उभा राहिला नाही, ना त्यासाठी कोणाचा कधी आग्रह राहिला. विमानतळ व्हावे ही इच्छा, मागणी इथल्या उद्योग, आयटी सेक्टर, तरुण शेतकऱ्यांची, स्वयंरोजगार करणाऱ्‍यांची, विद्यार्थ्यांची, कामगारांची राहिली आहे. या जनमानसाचा इथल्या लोकप्रतिनिधींनी कधीही सन्मान केला नाही, हेच यावरून स्पष्ट होते. ज्यांना फक्त राजकारण करायचे आहे, स्वतःच्या जागांचे भाव वाढवून घ्यायचे आहेत, जनतेच्या आशा आकांक्षा स्वप्नांचे काही घेणेदेणे नाही, अशांना आता किती का सहन करायचे हाही प्रश्न आहे. इथल्या जनतेला विमानतळ हवा आहे, हे नक्की. लोकप्रतिनिधींना हा आवाज ऐकायचा आहे की नाही हे आता त्यांनी ठरवायचे आहे. मतदार आता बदलला आहे, हे मात्र त्यांनी आवर्जून लक्षात ठेवावे.

विमानतळ रखडण्यातील ठळक टप्पे...

  • २००६ - खेड-चाकण परिसरात जागा निश्चिती.

  • २०१६ - तब्बल दहा वर्षांनंतर पुरंदरची जागा शोधण्यात आली.

  • २०१८ - सर्वं परवानग्यांचे सोपस्कार पार पडून भूसंपादनाचे आदेश.

  • २०२० - पुन्हा जागा बदलून बारामतीकडे सरकविण्यात आली.

  • २०२१ - नव्या जागेला परवानगी नाकारण्यात आली.

हे नक्की करा...

  • विमानतळाची जागा तातडीने निश्चित करा

  • प्रकल्पात राजकारण करणारे उघड करा

  • लोहगाव विमानतळाची क्षमता वाढवा

  • लोकप्रतिनिधी काय प्रयत्न करणार, हे जाहीर करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT