Lockdown Sakal
पुणे

पुण्यातील व्यापारी निर्बंध कायम ठेवल्याने आंदोलनाच्या पवित्र्यात

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शनिवारी (ता. ३१) आदेश जारी करत शहरातील निर्बंध कायम ठेवले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाची (Corona) साथ नियंत्रणात येऊन देखील निर्बंध (Restriction) कमी केले जात नसल्याने व्यापाऱ्यांनी (Traders) संताप व्यक्त केला आहे. महापालिका, राज्य शासना अशाच पद्धतीने काम करणार असेल तर आम्ही नोकरांचे पगार कसे द्यायचे, भाडे कसे द्यायचे, बॅंकांचे हप्ते कसे फेडायचे ? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. या निर्बंधामुळे व्यापाऱ्याचे मरण होत आहे, त्याला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी व्यवसायासाठी मोकळीक द्या अशी मागणी केली आहे. दरम्यान महापालिकेकडून (Municipal) दिलासा मिळाला नसल्याने व्यापाऱ्यांनी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. (Sanctity Movement by Maintaining Traders Restrictions in Pune)

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शनिवारी (ता. ३१) आदेश जारी करत शहरातील निर्बंध कायम ठेवले आहेत. यामध्ये दुकाने दुपारी चार वाजता बंद करावी लागणार असून, शनिवार-रविवारचा लॉकडाऊन कायम असून, मॉल देखील बंदच असणार आहेत. दरम्यान, शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असतानाही बाजारपेठांवर निर्बंध आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी निर्बंध शिथिल करा दुकाने रात्री आठ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्या अशी मागणी लावून धरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे आश्‍वासन दिले होते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत मंत्रालयातून निर्णय होईल असे स्पष्ट केले होते, पण अद्याप निर्णय झालेला नाही. त्यातच महापालिकेने निर्बंध कायम असल्याचा आदेश काढल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत. शनिवारी (ता. ३१) झालेल्या व्यापारी महासंघाच्या बैठकीत आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

‘दुकानांची वेळ सायंकाळी आठ पर्यंत असावी आणि शनिवार-रविवारी देखील दुकाने सुरू असावेत अशी आमची मागणी आहे. यासाठी वारंवार पाठपुरावा देखील सुरू आहे. उपनगरे व ग्रामीण भागात नियमांची कडक अंमलबजावणी नाही, पण शहराच्या मध्यवर्ती भागात कडक नियम आहेत. याचा परिणाम व्यवसायावर होत असून, आमचे ग्राहक तुटत आहेत.’

- राहुल बोरा, अध्यक्ष, लक्ष्मी रस्ता व्यापारी संघटना

‘दुकाने उघडणे व बंद करण्यावर असणारे निर्बंध, विकेंड लॉकडाऊन याचा विचार करता महिनाभरात सरासरी केवळ १० दिवसच व्यवसाय करता येत आहे. सरकार, महापालिका निर्बंध शिथिल करणार नसेल तर हॉटेल व्यवसायिकांसह इतर व्यावसायिकांवर आर्थिक आरिष्ट ओढवणार आहे. यातून आम्हाला सावरण्यासाठी निर्बंध कमी पाहिजेत.’

- बाळासाहेब अमराळे, अध्यक्ष, पुणे शहर-जिल्हा काँग्रेस व्यापारी सेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT