Sand-Theft
Sand-Theft 
पुणे

नदीपात्रात 500 फूट लांब व दोनशे फूट रुंद खड्डा केला आणि....

डी. के. वळसे पाटील

मंचर - श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथील घोड नदीच्या पात्रातून दोन लाख सहा हजार दोनशे पन्नास रुपये किमतीची वाळू अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्याची फिर्याद महसूल खात्याच्या वतीने मंचर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंचरचे मंडलाधिकारी योगेश रतन पाडळे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. वाळूचोरी माहिती समजल्यानंतर आंबेगाव-जुन्नरच्या प्रांत अधिकारी रमा जोशी यांनी मंडल अधिकारी, कामगार तलाठी यांच्यासह गावकर्यानसमवेत घटना स्थळी भेट दिली होती. त्यांनी चोरीला गेलेल्या वाळूसंदर्भात पंचनामे करुन चोरट्यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पाडळे यांनी पंचनामा केला.

नदीपात्राच्या मध्यभागी 500 फूट लांब व दोनशे फूट रुंद व 12 ते 14 फूट आकाराचा खड्डा करून उंच ढीग तयार केला. 20 ते 25 ब्रास वाळू चोरीला गेली आहे. उत्खनन, सरकारी मालमत्तेची चोरी, पर्यावरणाची हानी अशी फिर्याद दाखल केली आहे.

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

'महसूल खात्याकडून फिर्याद प्राप्त झाली आहे. वाळूची चोरी करणाऱ्या वाळूमाफियाचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करत आहोत”.
- कृष्णदेव खराडे पोलीस निरीक्षक, मंचर पोलीस ठाणे

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT