https://www.esakal.com/pune/due-non-cooperation-colleges-pune-ahmednagar-and-nashik-districts-many-students-are-coming
https://www.esakal.com/pune/due-non-cooperation-colleges-pune-ahmednagar-and-nashik-districts-many-students-are-coming 
पुणे

किरकटवाडीत चंदन तस्करांचा धुमाकूळ ; शेतकऱ्याच्या घराजवळून चोरली दोन चंदनाची झाडे

निलेश बोरुडे

किरकटवाडी (पुणे) : हवेली पोलिस ठण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून चंदन तस्करांनी हैदोस घातला आहे. किरकटवाडी (ता.हवेली) येथील शेतकऱ्याच्या घराजवळून शनिवारी पहाटेच्या सुमारास दोन चंदनाची झाडे चोरुन नेली आहेत. 12 व 13 सेंटीमीटर व्यासाची ही झाडे होती.

अंकुश, लहू व दत्ता हगवणे या तिघा भावांची किरकटवाडी येथील गट नं.348 मध्ये एकत्रित शेती आहे. त्यांच्या राहत्या घरामागे ही चंदनाची मोठी झाडे होती. शनिवारी सकाळी उठल्यानंतर चंदनाची झाडे अज्ञात चोरट्यांनी कापून नेल्याचे हगवणे यांना आढळून आले. या अगोदरही हगवणे यांच्या शेतातून तीन चंदनाची झाडे चोरीला गेली होती. याबाबत हवेली पोलिस ठाण्यात अंकुश हगवणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अजित शिंदे पुढील तपास करत आहेत.

हे ही वाचा : महाविद्यालयांच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांच्या विद्यापीठात फेऱ्या
  
चंदन तस्करी रोखण्यात पोलिस आणि वनविभाग अपयशी

परिसरातील नांदोशी, खडकवासला, किरकटवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतातून व वनविभागाच्या हद्दीतून सर्रासपणे चंदन तस्करी सुरू असून पोलिस आणि वनविभाग चंदन चोरी रोखण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. मागील महिन्यात खडकवासला जवळील लष्कराच्या हद्दीतून चंदन चोरी झाली होती. त्यातील भारत शिवाजी जाधव (रा.बोरीपार्धी, ता.दौंड) या तस्कराला पकडण्यात हवेली पोलिसांना यश आले आहे. मात्र त्याचे इतर साथीदार अजूनही फरार आहेत. तसेच यातील खरा सुत्रधार कोण? हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यातच आता पुन्हा किरकटवाडी येथून चंदनाची झाडे चोरीला गेल्याने ही टोळी सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. 

मुल्यांकनाबाबत वनविभागाचे अव्यवहार्य नियम

किरकटवाडी येथील हगवणे यांच्या शेतातून चोरीला गेलेली चंदनाची झाडे 12 व 13 सेंमी व्यासाची होती. वनविभागाच्या नियमांनुसार 15 सेंमी पेक्षा जास्त व्यास असेल तरच त्याची झाड म्हणून गणणा होते. त्यामुळे हगवणे यांच्या शेतातून चोरीला गेलेल्या झाडांचे मूल्यांकन होऊ शकत नाही, असे वनरक्षक मंजुषा घुगे यांनी सांगितले. त्यामुळे वनविभागाचे नियम अव्यवहार्य असल्याचे दिसून येत आहेत.

केवळ आकाराच नाही तर उपजात आणि जमिनीचा प्रकारही ठरतो महत्वाचा

चंदनाच्या झाडामध्ये गाभा भरण्याची प्रक्रिया ही केवळ झाडाच्या आकारमानावर अवलंबून नसते तर चंदनाचे झाड कोणत्या उपजातीचे आहे. तेथील खडक, माती पाण्याची उपलब्धता अशा अनेक घटकांचा गाभा भरण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. काही चंदनाची झाडे आकाराने लहान असतात, परंतु बुंध्यामध्ये गाभ्याचे प्रमाण जास्त असते, तर काही झाडे आकाराने खूप मोठी असली तरी त्यामध्ये गाभा भरलेला नसतो. वनविभागाने मुल्यांकनासाठी केवळ आकार हा निकष लावल्यामुळे शेतकऱ्यांचे तर नुकसान होत आहेच शिवाय गुन्हा दाखल करतानाही किंमतीबाबत संभ्रम राहत आहे.

कशी होते चंदन तस्करी?

चंदन तस्करी करणारे दिवसा शेतात, जंगलात फिरुन चंदनाची झाडे हेरुन ठेवतात. आजूबाजूला पाहणारे कोणी नसेल तर गिरमीटाच्या साहाय्याने झाडाच्या बुंध्याला जमिनीपासून काही उंचीवर छिद्र पाडून हे चोर गाभा भरलेला आहे की नाही याची खात्री करून घेतात. काही वेळा शेतकऱ्याला किरकोळ किंमत देऊन झाड विकत घेतात किंवा मग रात्रीच्या वेळी झाड चोरुन नेले जाते. चोरी करणारे हे शिवाराची माहिती असणारे असतात. पोलिसांकडून किंवा वन विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने चंदनचोरांचे हे जाळे गावोगावी पसरलेले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT