Sangharsha-Pathak.jpg 
पुणे

संघर्ष पथक : केवळ एक वाद्य पथक नव्हे तर परिवार

सकाळ वृत्तसेवा

एक विशेष ध्येय डोळ्यासमोर ठेऊन उदयास 26/6/2016 रोजी हे पथक आले. गणपती आणि ढोल-ताशा हे समीकरण पुणेकरांसाठी अगदी हृदयाजवळचे आहे. ढोल-ताशा संस्कृती ही महाराष्ट्राला लाभलेल्या खास संस्कृतींपैकी एक आहे. हा पारंपारिक वारसा खऱ्या पद्धतीने समजून घेऊन, समाजातल्या युवक वर्गाला योग्य दिशा दाखवण्यासाठी तसेच ही संस्कृती नक्की काय आहे ह्याची जाणीव करून देण्याचे कार्य पथक गेली सहा वर्षे अविरतपणे करत आहे. खासकरून पथकाने अवलंबलेली काही धोरणे ज्यामध्ये ताई-दादा संस्कृती, विश्वास आणि शिस्त खूप मोलाचे योगदान देतात.

युवकांप्रमाणेच ढोल आणि ताशा वाजण्याची खूप वर्षांची इच्छा असणाऱ्या  गृहिणी, शालेय विद्यार्थी, संगणक अभियंते, डॉक्टर्स, वकील अशा किती तरी विभिन्न क्षेत्रातील लोक संघर्ष पथकाचे सदस्य आहेत. 

ताई-दादा संस्कृतीबद्दल खास आग्रह धरणारे हे एकमेव पथक आहे असं बोलल्यास ते वावगं ठरणार नाही. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारी मनोवृत्तीमागे परस्त्री मातेसमान आणि मुलींकडे बहिण म्हणून पाहण्याची, त्यांचा आदर करण्याची छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण आजची पिढी विसरत चालली असल्याचे आम्हांला जाणवले, ही मानसिकता कुठेतरी थांबावी, तिला योग्य दिशा मिळावी ह्यासाठी पथकाने ताई-दादा संस्कृतीचा हात धरून हा वारसा पुढे नेण्यास वाटचाल सुरू केली. 

आज पथकाचे जवळपास 300 च्या आसपास सभासद आहेत जे पथकाच्या ह्या धोरणांचे पालन करतात आणि हाच वसा पुढे नेण्यासाठी ताकद लावतात. सरावासाठी जागेची भासणारी कमतरता इथून ते पथकात येणाऱ्या ताईंना उशिरापर्यंत थांबल्यानंतर घरी सोडण्याचा प्रश्न अशा अनेक समस्यांना सामोरे जात, संघर्ष करत पथक आज इथपर्यंत येऊन पोहचले आहे. पथकात सहभागी व्हायचं असेल तर ह्या सर्व तत्वांशी सहमत असलेल्या व्यक्तिमत्वांनाच पथकात प्रवेश दिला जातो आणि जर त्याचा कोणी भंग केल्यास पथकातून काढण्याची कारवाई देखील करण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT