Sangram Shewale has demanded this year Exam fee for Next exam  
पुणे

रद्द झालेल्या परीक्षेचे शुल्क पुढच्या सत्रासाठी घ्या; 'या' विद्यार्थी संघटनेने केली मागणी

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्यातील विद्यापीठांनी अंतीम वर्ष वगळता इतर वर्षांच्या परीक्षा रद्द झालेल्या आहेत, या विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्क पुढच्या सत्रासाठी जमा करून घ्यावे अशी मागणी जनता दल (से) विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संग्राम शेवाळे यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोना मुळे सर्वच विद्यापीठांच्या परीक्षेचे वेळपत्रक कोलमडून गेले आहे. त्यामुळे यूटीसीच्या निर्देशानुसार राज्य    सरकारने अंतीम वर्ष वगळता इतर सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून त्यांना अंतर्गत गुणांच्या मूल्यमापनावर पुढील वर्षात प्रवेश मिळणार आहे. या विद्यार्थ्यांनी मार्च महिन्याच्या पूर्वी परीक्षा शुल्क भरलेले आहे. मात्र परीक्षा रद्द झाल्याने या शुल्काचा विषय मार्गी लावण्यासाठी जनता दल (से) विद्यार्थी संघटनेने पाठपुरावा सुरू केला आहे. 
-----------
ग्रामीण भागातील गरिबी हटवण्यासाठी केंद्राची जीवोन्नती योजना; जाणून घ्या पात्रता
-----------
अनलॉक'ला आता डेडलॉक नको; अनलॉककडून लॉकडाऊन हा उलटा प्रवास न परवडणारा
-----------

कोरोना मुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचा कामधंदा बुडाला आहे, अशा काळात विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरलेले आहे, ते पुढच्या सत्रासाठी वापरावून त्यांना दिलासा द्यावा, अशी  मागणी संग्राम शेवाळे यांनी केली आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वार्षिक शुल्क वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यास जनता जल विद्यार्थी संघटनेने विरोध करत शुल्क वाढ थांबवण्यासाठी मागणी कुलगुरूंकडे केली होती, तसेच त्यानंतर पाठपुरावा ही केला  त्यामुळे नगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांची कोरोनामुळे परीक्षा झाली नाही त्यांची फी परत मिळावी किंवा पुढच्या सत्रात लागू व्हावी त्यावर विद्यापीठाचा अभ्यास सुरू आहे, असे व्यवस्थान परिषदेच्या सदस्यांनी सांगितले असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iranian Oil Tanker: होर्मुझ ओलांडल्यानंतर समुद्रात मोठा खेळ; भारताकडे निघालेल्या इराणी जहाजाचा यू-टर्न, चीनला जात आहे तेल

प्रतीक्षा संपली! यंदा स्वामी शुक्रवारी नाही गुरुवारीच येणार .. प्रविण तरडेंच्या 'देऊळ बंद २'ची रिलीज डेट समोर; कोण साकारणार मुख्य भूमिका?

IAS transfer news : कोल्हापूर जिल्हाधिकारी, झेडपी सीईओ, महापालिका आयुक्तांची बदली; एकाच दिवशी धडाधड बदल्यांच्या आदेशाने चर्चांना उधाण

Konkan Mango Farmers : कोकणच्या हापूस उत्पादकांसाठी मोठी बातमी! राजू शेट्टींच्या मध्यस्थीनंतर व्यापाऱ्यांनी घेतला 'हा' निर्णय, वाशी APMC मधील बैठकीत काय ठरलं?

Latest Marathi News Live Update : मुंबई महापालिकेतील हजार कोटींच्या टेंडर्सवर मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT