पुणे

Kasba Bypoll Result : "पराभवाची नैतिक जबाबदारी माझी" ; संजय काकडेंचा देवेंद्र फडणवीसांना मेसेज

अक्षय बडवे

Kasba Bypoll Result : कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये भाजपच्या विजयी घोडदौडीला रोखता येऊ शकते याबद्दलचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीवर या पोटनिवडणुकीचा मोठा परिणाम होणार आहे.  थोड्याच वेळापूर्वी जाहीर झालेल्या याच निर्णयावर आता माजी राज्यसभा खासदार संजय नाना काकडे यांनी भाष्य केलं आहे.

आगामी काळात शहर भाजपमध्ये मोठी उलथापालथ होणार असून भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर या पराभवाने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सगळ्या परिस्थितीवर संजय काकडे यांनी भाष्य करत भाजपला नक्कीच आता या निकालावर आत्मचिंतन कराव लागेल.

तसेच जो पराभव घडलेला आहे त्या पराभवाची नैतिक जबाबदारी माझी देखील आहे त्यामुळेच मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज करून दिलगिरी व्यक्त करून जी काही कारवाई करायची असेल ती माझ्यावर करू शकता, अशा प्रकारचा संदेश पाठवला असल्याचे देखील यावेळी संजय काकडे यांनी सांगितले.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठ मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला आहे. धंगेकरांना ७२ हजार ५९९ तर भाजप उमेदवार हेमंत रासने यांना ६१ हजार ७७१ मतं मिळाली आहेत. साधारण १० हजार ८०० मतांनी धंगेकर विजयी झाले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT