Chitra Wagh sakal
पुणे

संजय राठोडप्रमाणे आता रघुनाथ कुचिक प्रकरणातही पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पदच

'पुणे पोलिस आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या बलात्कारी पिलावळीला वाचविण्याच्या प्रयत्नत व्यस्त आहेत. संजय राठोड नंतर रघुनाथ कुचिक प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे.

सकाळ वृत्तसेवा

'पुणे पोलिस आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या बलात्कारी पिलावळीला वाचविण्याच्या प्रयत्नत व्यस्त आहेत. संजय राठोड नंतर रघुनाथ कुचिक प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे.

पुणे - 'पुणे पोलिस (Pune Police) आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या बलात्कारी पिलावळीला वाचविण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहेत. संजय राठोड नंतर रघुनाथ कुचिक प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद (Doubtful) आहे. या प्रकरणाचे पूजा चव्हाण (Pooja Chavan) प्रकरण करु नका' अशी टिका महाराष्ट्र भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मंगळवारी केली. वर्गात घुसुन मुलीवर हल्ला झालेल्या शाळेची मान्यता तपासावी आणि मुलीचा वैद्यकीय खर्च शासनाने उचलावा, असेही वाघ यांनी सांगितले.

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्याविरुद्ध 24 वर्षीय तरुणीने दाखल केलेल्या प्रकरणाबाबत वाघ यांनी मंगळवारी पत्रकार परिषद आपली भुमिका मांडली. वाघ म्हणाल्या, 'संबंधित तरुणी मागील काही दिवसापासून बेपत्ता आहे. तिच्या जीवाला धोका आहे. पीडित मुलीचे काल इस्लामपूर येथे लोकेशन होते, तर आज पणजी येथे आहे. तिच्या घातपाताची शक्यता मला वाटते आहे."

'सत्ताधाऱ्यांच्या बलात्कारी पिलावळीला वाचविण्यात पुणे पोलीस आयुक्त व्यस्त आहेत'

पूजा चव्हाण प्रकरणाप्रमाणे या तरुणीचे करु नका. संजय राठोड़नंतर कुचिक प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिक संशयास्पद आहे. नागपुर विद्यापीठातील एका विद्यार्थीने प्राध्यापकावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. हे प्रकार गंभीर आहेत.'असेही वाघ यांनी स्पष्ट केले.

शहरातील 4 ते 5 रुग्णालयात तरुणीचा गर्भपात

शहरातील 4 ते 5 रुग्णालयात तरुणीचा गर्भपात करण्यासाठी तिला नेण्यात आले होते. त्यापैकी 2 रुग्णालयाची पोलिसांनी चौकशी केली, परंतु एका नामांकित रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी कुचिकने त्याच्या ओळखपत्राचा वापर केला, त्या रुग्णालयाची अद्याप पोलिसांनी चौकशी केलेली नाही.

तरुणी सापडल्याबाबत पोलिसांकडून सत्ताधारी व विरोधकांना वेगवेगळी उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न

या प्रकरणातील तरुणी अद्यापही सापडत नाही, पोलिस, आम्हीही शोध घेत आहोत. पोलिस तरुणी सापडली नाही, असे आम्हाला सांगत आहेत, तर दुसरीकडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना मात्र तरुणी तिच्या वडिलांसमवेत सुखरूप असल्याचे सांगून आमची दिशाभूल करीत आहेत. सत्ताधारी व विरोधकांना पोलिस वेगवेगळ्या स्वरूपची दिशाभूल करणारी माहिती देत आहेत.

वडगाव शेरी येथील विद्यार्थीनीवरील चाकू हल्ला प्रकरणात शाळेची मान्यता तपासावी, शासनाने उपचाराचा खर्च उचलावा

सोमवारी सकाळी अकरा वाजता घटना वडगाव शेरी येथील इनामदार शाळेत मुलीवर एकाने चाकू हल्ला केला. हि घटना घडल्यानंतर मुलगी काही तास रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असतानाही इनामदार शाळेने तिला रुग्णालयात नेले नाही, तिच्या वडिलांची वाट पाहात बसले. त्यामुळे या शाळेला खरच मान्यता आहे का? याची तपासणी करावी. मुलीची आर्थिक परिस्थिती हालाखिची आहे, कुटुंबाला उपचार परवडणारे नाहीत. त्यामुळे राज्य शासनाने तिची जबाबदारी घेऊन उपचाराचा सर्व खर्च उचलावा' असेही वाघ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT