Kasba Bypoll Election  
पुणे

Kasba Bypoll Election : भाजपकडून पोलिसांच्या गाड्यांमध्ये पैशांची देवाण-घेवाण ; ठाकरे गटाचा गंभीर आरोप

सकाळ डिजिटल टीम

Kasba Bypoll Election : पुण्यातील कसबा-चिंचवड पोटनिवडणुक प्रचाराचा काल (शुक्रवार) शेवटचा दिवस होता. सर्व पक्षांनी मोठ्या प्रमाणात प्रचार केला आहे. दिग्गज नेते मैदानात उतरले होते. उद्या या दोन्ही मतदारसंघात मतदान होणार आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजपने पोलिसांच्या मदतीने निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. 

कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपने पोलिसांच्या मदतीने मतदार संघात पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या अनेक वेळा पोलिसांच्या मदतीने निवडणुकीत पैसे वाटल्या जातात. मागच्या निवडणुकीत बारामती, पुणे भागात पोलिसांच्या गाडीतून कसे पैसे वाटले, हे पुराव्यासह उघड झालं आहे. पोलिसच राजकीय एजंट बनून पैसे वाटतात. भाजपकडून पोलिसांच्या गाड्यांमध्ये पैशांची देवाण-घेवाण झाल्याचे उघड झाले आहे. 

फडणवीसांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय -

एकनाथ शिंदे यांनी बंड केला त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला होता आणि मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय झाली आहे. पूर्वीचे फडणवीस आणि आताचे फडणवीस यात खूप फरक दिसतोय. त्यांना स्टंट करण्याचा छंद जळला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Radhakrishna Vikhe Patil: दुष्काळावर विखे पाटलांचे मोठे वक्तव्य; ‘५ ऑक्टोबरपर्यंत चित्र स्पष्ट होईल, केंद्र-राज्य मिळून मदतीचा निर्णय’

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT