Sanjay Raut Mission Pune Municipal Corporation 
पुणे

संजय राऊतांचे 'मिशन पुणे महापालिका'

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ''पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेचे 50 नगरसेवक निवडून आणायचे आहेत. त्यासाठी जोरात तयारी करा आणि महापालिकेतील सत्तेतूनही भारतीय जनता पक्षाला हटवा, अशा शब्दांत नगरसेवक-पदाधिकाऱ्यांना आदेश देत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 'मिशन पुणे महापालिका' हा नवा कार्यक्रम शनिवारी जाहीर केला. 

काँग्रेससोबत सूर जुळण्यात 'या' गांधींचा मोठा वाटा: संजय राऊत

वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त पुण्यात आलेल्या राऊत यांनी शिवसेना भवनात पक्षाचे नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाळा कदम, शहरप्रमुख संजय मोरे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार उपस्थित होते. तेव्हा संघटनात्मक बांधणीचा आढावा घेत, महापालिकेतील शिवसेनेची कामगिरी आणि भाजपची धोरणे या मुद्दयांवर राऊत यांनी नगरसेवकांशी चर्चा केली. प्रभागरचनेतील बदलांच्या पार्श्‍वभूमीवर नवी राजकीय गणिते मांडताना शिवसेनेची ताकद वाढविण्याचा संदेश दिला. 

राऊत म्हणाले, "पुण्यात संघटना मजबूत असली तरी, ती लोकांपर्यंत पोचली पाहिजे. ज्यामुळे विरोधकांच्या कारभारावर वचक राहणार आहे. ही ताकद निर्माण करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने तेवढ्या ताकदीने काम केले पाहिजे. पुढच्या दोन वर्षांत होणाऱ्या महापालिकेच्या सर्वाधिक 50 नगरसेवक शिवसेनेचे असतील, या दृष्टीने काम करा. या निवडणुकांत कोण-कोणासोबत असेल, यापेक्षा आपण स्वत: कसे लढू, यावर भर द्या.'' 


Video : नाताळ निमित्त विकएंडला बाहेर पडलेले पुणेकर अडकले कोंडीत

पुणे शहर शिवसेनेतील गटबाजी उफाळून येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर राऊत काय भूमिका घेणार आणि गटबाजी करणाऱ्या कशी समज देतील, याकडे लक्ष होते. आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी राऊत यांची शिवसेना भवनात वैयक्तिक भेट घेतली. मात्र, पक्षातर्गंत राजकारणावर राऊत काहीच बोलले नाहीत. त्यामुळे शिवसेनेत सारे काही आलबेल असल्याचे स्पष्ट झाले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Vidhansabha: संसदीय परंपरा आणि कायदा कसा बनतो? विद्यार्थ्यांनी समजून घेतली प्रक्रिया! मुख्यमंत्र्यांकडून भरभरून कौतुक!

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ashadhi Ekadashi 2026 Breakfast Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासासाठी झटपट रेसिपी; १५ मिनिटांत बनवा मऊ, स्पंजी उपवासाची इडली

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ जुलै २०२६

SCROLL FOR NEXT