Vijay Shivtare on Sanjay Raut sakal
पुणे

संजय राऊत यांनी शिवसेना बारामतीच्या वळचणीला बांधली - विजय शिवतारे

शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना बारामतीच्या वळचणीला बांधली.

सकाळ वृत्तसेवा

शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना बारामतीच्या वळचणीला बांधली.

पुणे - शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना बारामतीच्या वळचणीला बांधली. यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेचे मोठे नुकसान झाले आहे, असा आरोप शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बुधवारी (ता.२९) पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला. (Vijay Shivtare on Sanjay Raut)

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाचविण्यासाठी मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे. त्यामुळे आपला एकनाथ शिंदे यांना पाठिंबा आहे, असे म्हणत शिवतारे यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत. एकनाथ शिंदे गटातील ५१ जणांवर कारवाई झाली तर, मी त्यात ५२ वा असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शिवसेनेच्या ३९ आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेचा स्वतः:चा गट स्थापन करण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मात्र शिंदे प्रथम सुरतला नंतर गुवाहाटीला गेले त्यावेळी मी कोरोना पॉझिटिव्ह होतो. त्यामुळे मला प्रत्यक्षात समोर येता येत नव्हते. परंतू त्याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांना व्हॉट्स ॲप'द्वारे पत्र पाठवून महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडत हिंदुत्ववादी पक्षाशी युती करण्याची मागणी केली होती. परंतु अद्याप या पत्राला प्रतिसाद मिळू शकला नाही, असे शिवतारे यांनी यावेळी सांगितले.

पुणे जिल्ह्यातही शिवसेनेला खिंडार

माजी मंत्री विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे गटात सामील होणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आमदारांच्या फुटी पाठोपाठ आता पुणे जिल्ह्यातही शिवसेनेला खिंडार पडल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुरंदर तालुक्यातील विकासकामे होत नाहीत. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी सोबतची आघाडी तोडावी, अशी मागणीही विजय शिवतारे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी घेतलेली भूमिका ही शिवसेनेसाठी चांगली आहे. त्यामुळेच आम्ही एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जाणं क्रमप्राप्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विसर्जन मिरवणुकीमुळे पीएमपी बसच्या मार्ग आणि स्थानकांत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग

Bank News : ग्राहकांसाठी रविवारी बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरच्या संपाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Nanded Farmers: ‘काजू-बदाम खा, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’; अर्धापुरात काँग्रेसचा जनाक्रोश, घंटानाद करून दुष्काळ जाहीर

मुंबईकरांचा प्रवास सुसाट! ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गासह 'ठाणे-बोरिवली'साठी दुय्यम कर्ज; सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

SCROLL FOR NEXT