Agitation Sakal
पुणे

संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम शेतक-यांनी बंद पाडले

संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील गोजुबावी व कटफळ गावातील शेतक-यांनी निवाडा रक्कम चुकीची असल्याच्या निषेधार्थ या मार्गाचे काम आज बंद पाडले.

- मिलिंद संगई

बारामती - संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील गोजुबावी व कटफळ गावातील शेतक-यांनी निवाडा रक्कम चुकीची असल्याच्या निषेधार्थ या मार्गाचे काम आज बंद पाडले.

गोजुबावी व कटफळ या गावातील बाधित शेतक-यांना प्रति गुंठा चार लाख सहा हजार या प्रमाणे नुकसान भरपाईबाबत नोटीस देण्यात आली होती. मात्र पुन्हा शेतक-यांना नवीन नोटीस प्राप्त झाली असून निवाडा दुरुस्त करुन सदरची नोटीस आल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे.

बाजारभावाच्या मूल्यापेक्षा कमी मूल्यांकन करुन नवीन नोटीस दिल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे. बेकायदा दुरुस्त केलेला निवाडा रद्द करा, पूर्वीच्या निवाड्यानुसारच मोबदला द्यावा, मोबदला दिल्याशिवाय काम सुरु करु नये अशा मागण्या शेतक-यांनी केल्या आहेत. या मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर हे काम करु देणार नसल्याची भूमिका शेतक-यांनी घेतली आहे. या बाबत 29 सप्टेंबर रोजी अर्ज दिलेला असतानाही उपविभागीय अधिका-यांनी दडपशाही पध्दतीने काम सुरु ठेवल्याचाही आरोप करण्यात आला.

महामार्ग कायदयानुसार सहा महिन्यानंतर निवाडा दुरुस्त करता येत नाही, असे असताना दोन वर्षांनंतर निवाडा दुरुस्त करुन गोजुबावी व कटफळ गावातील शेतक-यांना बाजारभावाच्या मूल्याहून कमी किंमतीच्या नोटीसा कशा काय पाठवल्या गेल्या असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

मूल्यांकन नियमानुसारच...

मूल्यांकनाचा विषय फक्त गोजुबावीपुरताच मर्यादीत आहे. शासकीय मूल्यांकन हे योग्यच आहे, त्याच कमी मूल्यांकनाचा विषय नाही- दादासाहेब कांबळे, उपविभागीय अधिकारी, बारामती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT