Ashadhi Wari 2024 
पुणे

Ashadhi Wari : काटेवाडीमध्ये तुकोबारायांच्या पालखीला मानाच्या मेंढ्यांचे पहिले रिंगण; सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी

Ashadhi Wari 2024 : आषाढी वारीनिमित्त मजल दर मजल करीत वैष्णवांची वारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

काटेवाडी : काटेवाडी (ता. बारामती ) येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मेंढ्यांचे रिंगण सोहळा पार पडला. राम कृष्ण हरी, ज्ञानबा-तुकाराम असा जयघोष करीत वैष्णवांच्या अलोट उत्साहामध्ये, वरुण राजाच्या साक्षीने मानाच्या मेंढ्या धावल्या. रिंगणाचा हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती.

आषाढी वारीनिमित्त मजल दर मजल करीत वैष्णवांची वारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामती मुक्कामानंतर दुपारी काटेवाडीत भोजन व विश्रांतीसाठी विसावला होता. सणसर मुक्कामी मार्गस्थ होत असताना मेंढ्याचे रिंगण झाले. तुकोबांची पालखी काटेवाडी येथे पोहोचताच भक्तिमय वातावरणात ग्रामस्थांनी स्वागत केला. सुरुवातील परीठ समाजाकडून पालखीला धोतराच्या पायघड्या घालण्यात आल्या. विसाव्यानंतर पालखी सणसरच्या दिशेने निघाली असता यावेळी मानाच्या मेंढ्याचे रिंगण पार पडले. एका पाठोपाठ एक अशा मेंढ्या धावल्या.

वारकरी पायी प्रवास, ऊन पावसाची तमा न बाळगता भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन पांडुरगाच्या दर्शनाची आस घेऊन निघतो. या दरम्यान रिंगण सोहळा म्हणजे या पायी प्रवासाचा शिण घालवणारा असतो. त्यामुळे वारकरी, टाळकरी, माळकरी, वीणेकरी , तुळशीवाल्या महिला पालखीभोवती हरिनामाचा गजर करीत रिंगणाभोवती उभ्या होत्या. रिंगण सोहळा झाल्यानंतर पालखीने इंदापूर तालुक्यात प्रवेश केला. रविवारी (ता. ७) रात्री सणसर येथे संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम पार पडला.

आषाढी पालखी सोहळ्यामध्ये उभे रिंगण आणि गोल रिंगण अशा दोन रिंगणाच्या पद्धती पाहायला मिळतात. हा रिंगण सोहळा पाहायला दोन्ही पालखी मार्गावर वारकरी प्रचंड गर्दी करतात. मात्र काटेवाडीतील मेंढ्यांचे रिंगण हे संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील अनोखे वैशिष्ट्य आहे.

मेंढ्यांचे रिंगण का?

याबाबत काटेवाडी येथे एक आख्यायिका प्रसिद्ध आहे, एकदा संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामतीत आगमन झाले होते. त्यावेळेस काटेवाडी आणि आसपासच्या परिसरात मेंढ्यांवर एका विशिष्ट रोगाची साथ पसरली होती. त्या साथीत अनेकांच्या मेंढ्या मरण पावू लागल्या होत्या. काटेवाडीत संत तुकाराम महाराजांची पालखी आली असता एका मेंढपाळाने आपल्या मेंढ्यांसह तुकोबारायांना तीन रिंगण घालून, मेंढ्यांवरचा रोग संपू दे आणि त्या जिवंत राहू दे अशी प्रार्थना त्यावेळेस त्या मेंढपाळाने केली होती. पुढे हीच परंपरा कायम राखली गेली आणि आजही काटेवाडीत संत तुकोबांच्या पालखीचे आगमन होताच मेंढ्यांचे अनोखे रिंगण पार पडते.

तत्पूर्वी दुपारी पालखी रथाचे स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सरपंच मंदाकिनी भिसे, उपसरपंच मिलिंद काटे तसेच ग्रामपंचायत सदस्य, अनेक संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये झाले.

धोतराच्या पायघड्या घालून पालखीचे स्वागत....

या रिंगणाखेरीजही काटेवाडीत संत तुकोबारायांच्या पालखीचे अनोखे स्वागत करण्याची परंपरा आहे. परीट पायघड्या अशी या परंपरेची ओळख आहे. पालखीचे काेवाडीत स्वागत करताना इथले परीट समाजाच्या वतीने पालखीच्या मुख्य मार्गावर धोतराच्या पायघड्या घालून स्वागत करतात. हा सोहळाही अत्यंत रमणीय असा असतो. ही परंपराही अनेक वर्ष जुनी परंपरा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: काव्या मारनच्या संघात ३००+ विकेट्स घेणारा खेळाडू दाखल; KKRनेही विदर्भच्या पोट्ट्यासाठी मोजले लाखो

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा ठाणेकरांना दिलासा! १०० कोटींची देणी थकीत, अनेक महत्त्वाच्या गोष्टींची तरतूद; वाचा सविस्तर

Latest Marathi News Live Update : दीपक केसरकर यांच्या विरोधात सावंतवाडीत मोर्चा

Australia Cricket: खेळपट्टी तयारीत लुडबुड नसणार; आर्थिक फटका बसल्यानंतर ऑस्ट्रेलियन मंडळाचा पवित्रा

Santwadi Leopard News: संतवाडीत बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद; जन्नुर तालुक्यातील घटना, शेतावर वनविभागाने पिंजरा लावला अन्..

SCROLL FOR NEXT