sarhad Jammu and Kashmir International Film Festival will be held in January 2024 sakal
पुणे

Pune : सरहद जम्मू आणि काश्मीर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जानेवारीत होणार

सरहद संस्थेच्या वतीने ‘दुसरा सरहद जम्मू आणि काश्मीर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ आयोजित करण्यात आला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सरहद संस्थेच्या वतीने ‘दुसरा सरहद जम्मू आणि काश्मीर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव पुण्यात ६ ते १० जानेवारी २०२४ दरम्यान होणार आहे. यंदा ‘महाराष्ट्र काश्मीर’ ही महोत्सवाची संकल्पना असणार आहे, अशी माहिती सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यंदा होणाऱ्या पाच दिवसीय महोत्सवाचे उद्‌घाटन नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात सहा जानेवारी रोजी होणार आहे. या महोत्सवातील चित्रपट राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात दाखविले जाणार आहेत. महोत्सवाचा समारोप १० जानेवारी रोजी होणार आहे. जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्रातील निर्मात्यांनी निर्माण केलेल्या, दिग्दर्शित केलेल्या अथवा भूमिका असलेल्या आणि ३१ डिसेंबर २०२० नंतर बनविण्यात आलेल्या ‘फिल्म’ महोत्सवासाठी पात्र ठरणार आहेत.

स्पर्धेत महाराष्ट्रातील ४५ मिनिटांपर्यंतची फिल्म, लघुपट यांनाही सहभागी होता येणार आहे, अशी माहिती चित्रपट महोत्सव संचालक मुश्ताक अली, अहमद खान, डॉ. शैलेश पगारिया, चित्रपट निर्माते नीलेश नवलाखा, युवराज शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२३ ही अंतिम तारीख असून अधिक माहितीसाठी ‘www.jakiff.com’ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ती' झोपेत असताना मध्यरात्री अंथरुणात साप शिरला अन् हालचाल होताच..; सर्पदंशाने 13 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Latest Marathi News Updates : संजय राऊत करमणूक करणारं पात्र, केंद्रीय मंत्र्यांचा टोला

Purna Aaji Death : नकळत का होईना पण जाण्यापूर्वी पूर्णा आजीने प्रेक्षकांची 'ती' इच्छा केली पूर्ण, व्हिडिओ पुन्हा चर्चेत..

Bhandara Accident: मुलाचा मृत्यू; वडील गंभीर, डोझर ट्रॅक्टरने दिली धडक, अंत्यविधीसाठी जात असताना अपघात

Asia Cup 2025: जसप्रीत बुमराहची टीम इंडियात निवड होणार की नाही? महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT