Dr Neelam Gorhe
Dr Neelam Gorhe Sakal
पुणे

सरपंच, ग्रामसेवकांनी गावे कोरोनामुक्त करावीत; डॉ. नीलम गोऱ्हे

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जिल्ह्यातील अधिकाधिक गावे (Vilages) कोरोनामुक्त (Coronafree) करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, यासाठी राज्य सरकारने (State Government) घालून दिलेल्या नियमांचे (Rules) काटेकोरपणे पालन करून आपापल्या गावात यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबबतची कडक अंमलबजावणी करावी, असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr neelam Gorhe) यांनी केले. (Sarpanch Gramsevaks Liberate Coronafree Villages Dr Neelam Gorhe)

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावांच्या सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांशी डॉ. गोऱ्हे यांनी जिल्हा परिषदेत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. तत्पूर्वी त्यांनी ग्रामीण भागातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पंचायत समित्यांचे सभापती, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच उपस्थित होते.

कोरोनामुक्तीसाठीच्या सरकारी योजनांची अंमलबजावणी करताना त्यात गावकऱ्यांना सहभागी करून घेणे, हीच यशाची पहिली पायरी ठरते आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर गावांनी आतापासूनच खबरदारी घ्यावी, यानुसार मास्क लावणे, वारंवार हात धुणे, गर्दीत जाणे टाळणे आणि दोन व्यक्तींमध्ये पुरेसे अंतर राखणे, या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. जेव्हा गावेच्या गावे बाधित होऊ लागतात, तेव्हा गावपातळीवर गृह विलगीकरणाच्या व्यवस्था फसतात. याच कारणाने दुसऱ्या लाटेमध्ये गृहविलगीकरण कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

कोरोना सद्यःस्थितीचा घेतला आढावा

दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीत त्यांनी कोरोनाची सद्यःस्थिती, ग्रामीण भागातील लसीकरण, हॉटस्पॉट भागातील धडक मोहिमेतील तपासण्या, एकूण बाधित रुग्ण, तपासण्यांचे प्रमाण, मागील तीन महिन्यांतील वयोगटानुसार मृत्युदर, सर्वात जास्त क्रियाशील रुग्ण, हॉटस्पॉट ग्रामपंचायती, कार्यान्वित झालेले ऑक्सिजन प्लँट, म्युकरमायकोसिसची ग्रामीण भागातील स्थिती, कोविड लसीकरण केंद्र आणि लससाठा आदींचा आढावा घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT