Sasoon hospital new building is collapsed due to internal work 
पुणे

ससूनच्या रुग्णांचे हाल; अकरा मजली इमारत पडून

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील बड्या रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवा सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेली असल्याने त्यांच्यासाठी ससून हेच एकमेव आशास्थान आहे. अकरा मजली इमारत बांधून पूर्ण आहे. परंतु, अंतर्गत काम रखडल्यामुळे ती पडून आहे. दुसरीकडे औषधांचा तुटवडा, वेगवेगळ्या रोगनिदानांचे संपलेले किट आणि क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण, अशा समस्यांनी ससून रुग्णालय वेढले आहे. 

ससूनमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा मिळावी, त्यांना सर्व वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज अशा रुग्णालयात अत्यंत माफक दरात उपचार व्हावेत, तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला त्यांना मिळावा, या उदात्त हेतूने दहा वर्षांपूर्वी या अकरा मजली इमारतीचे बांधकाम सुरू झाले. मात्र, पाच वर्षांमध्ये ही इमारत प्रत्यक्ष वापरात येऊ शकली नाही. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असले, तरीही त्यातील दारे-खिडक्‍यांपासून ते फर्निचरपर्यंत आणि शस्त्रक्रिया कक्षांपासून ते अग्निशमन यंत्रणेपर्यंत प्रत्येक टप्प्यावरील निविदेत अडथळे आले. त्यातून या कामाची गती कमी झाली. आता काही अंशी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम पुढे गेले असले, तरीही नेमके कधी पूर्ण होईल, याची पुणेकरांना उत्सुकता आहे. 

प्रत्येक गरीब रुग्णाला रुग्णालयातच मोफत औषध मिळणे आवश्‍यक आहे. खरेतर तो त्यांचा आरोग्य हक्क आहे. पण, सरकारकडूनच औषधांचा पुरेसा पुरवठा होत नाही. काही औषधे त्यांच्या नातेवाइकांनाही बाहेरून विकत आणण्यासाठी लिहून दिली जातात. स्थानिक पातळीवर ही औषधे खरेदी करण्याची सूचना सरकारने दिली आहे. परंतु, त्याचा निधी हा मोठा प्रश्‍न आहे, असे सरकारी रुग्णालयातील अधिकारी सांगतात. 

औषधांबरोबरच डेंगी, हिवताप यांच्या अचूक रोगनिदानासाठी आवश्‍यक किटचाही पुरवठा सरकारने राज्यातील रुग्णालयांना केला नसल्याच्या तक्रारीचा सूर डॉक्‍टरांनी काढला आहे. त्यामुळे या रोगाचे निदान करताना कसरत करावी लागत असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

रुग्णालयात अद्ययावत वैद्यकीय उपकरणांची गरज आहे. त्यासाठी काही संस्था, संघटनांनी मदतीचा हातदेखील पुढे केला आहे. पण, अकरा मजली इमारतीची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे या संस्थांनी मंजूर केलेली उपकरणे प्रत्यक्षात रुग्णालयात आणता येत नाहीत. बहुतांश वेळा क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण उपचारांसाठी दाखल असतात. त्याचा थेट ताण रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांवर पडतो. सुरक्षाव्यवस्था, वैद्यकीय सेवेच्या व्यवस्थापनाची मोठी समस्या रुग्णालय प्रशासनापुढे आहे. 

रुग्णांचे प्रमाण वाढले 
ससूनमध्ये उपचारांसाठी दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 12 वर्षांमध्ये 61 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. त्या प्रमाणात पायाभूत सुविधा, वैद्यकीय सुविधा, औषधपुरवठा, वैद्यकीय उपकरणे ससून रुग्णालयाला मिळालेली नाहीत. 

ससून रुग्णालयच का? 
- मोठ्या रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवा महागडी 
- ससून रुग्णालयाची प्रतिमा सुधारली 
- एमआरआय, सीटी स्कॅनच्या सुविधा उपलब्ध 
- तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला कमी खर्चात मिळतो 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Dhas: ''माझा मुलगा सुपारीसुद्धा खात नाही'', 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'च्या आरोपावर सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

एक नायक तर दुसरी खलनायिका; टीव्हीचे गाजलेले चेहरे पुन्हा भेटीला येणार; कोण आहेत ते? प्रेक्षकांनी सांगितली नावं

Jalgaon News : खेळता खेळता हरवला जीव! जळगावात १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Electricity Supply: अदानी हटाव..., प्रीपेड मीटरला ग्राहकांचा नकार; महावितरण खाजगीकरणाविरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

Pune Market Committee : संचालक मंडळ बरखास्त करून ईडी व इन्कम टॅक्स चौकशी करा; राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष विकास लवांडे यांची मागणी

SCROLL FOR NEXT