In Saswad 4 new corona Patient is found 
पुणे

पुरंदर तालुका 30 वर; पुन्हा मुंबई - पुणे कनेक्शनमधूनच धोका वाढतोय

- श्रीकृष्ण नेवसे

सासवड :  येथे शहरात राहणारा व हडपसर भागात बँक शाखेत काम करणार्‍या कर्मचाऱ्यास कोरोनाची बाधा झाल्याचे तहसीलदार रुपाली सरनौबत यांनी सांगितले. तसेच दोन व्यापाऱ्यांसह त्यांच्या घरातीलच एक महिलाही कोरोना पाॅझीटिव्ह आजच आढळली. त्यातून एकट्या सासवड शहरातील रुग्ण संख्या 14 वर पोचली व चिंता प्रचंड वाढली आहे. तर तालुक्यातील एकुण पाॅझीटिव्ह  रुग्ण संख्या 30 वर पोचल्याने संसर्गाचा धोका आणखी वाढत असल्याचे स्पष्ट आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सासवडच्या एकुण 14 रुग्ण संख्येत 9 रुग्ण या चार दिवसातील आहेत. म्हणजेच संसर्गाचा वेग वाढल्याचे स्पष्ट आहे. 30 रुग्णांमधील बहुतेक  बाधीत रुग्ण हे मुंबई - पुणे कनेक्शनमधीलच आहेत. हाच धोका वाढतोय.. तरीही अजूनही मुंबईहून कुटुंबासह गावाकडे येणे थांबलेले नाही. पुण्यात जा ये करणारे तर शेकडो जण असून 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लोकांमध्ये न मिसळण्याची काळजी घ्यावी लागेल. अन्यथा सासवड पुण्याजवळ असल्याने धोका आणखी समोर दिसत आहे; असे जाणकारांकडून व डाॅक्टर मंडळीकडून सांगण्यात आले.

तीस दिवसांच्या बाळाची झुंज यशस्वी; ससूनमध्ये उपचार
 
दरम्यान; कोविड विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून पुरंदर तालुक्यात प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात आलेल्या  आहेत. रुग्ण सापडलेल्या ठिकाणी लगेच सर्व्हे व पुढील कार्यवाही होत आहे; असे सांगण्यात आले. तसेच तालुक्यात एकूण 30 कोरोनाग्रस्त रुग्णापैकी तीन रुग्ण मयत झालेले आहेत. तसेच 9 रुग्णांना घरी सोडण्यात आलेले आहेत. उर्वरित 18 कोरोनाग्रस्त रुग्ण हे पुण्यात विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत., असेही  प्रशासनाकडून स्पष्ट झाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT