पुणे

सातारारोड फाळके विरुद्ध फाळके लढत

CD

सातारारोडच्या मैदानात फाळके विरुद्ध फाळके

गणांमध्ये अटळ असलेल्या मतविभागणीमुळे कोणाचे पारडे जड

राजेंद्र वाघ : सकाळ वृत्तसेवा
सातारारोड, ता. २८ : सातारारोडमध्ये बऱ्याच कालावधीनंतर जिल्हा परिषदेच्या गटात होत असलेल्या फाळके विरुद्ध फाळके, या सरळ लढतीने लक्ष वेधून घेतले असून, त्यात राष्ट्रवादीच्या सुप्रिया किशोर फाळके, की शिवसेनेच्या सारिका रत्नदीप फाळके यापैकी कोण बाजी मारणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. किन्हई गणामध्ये तीन उमेदवार रिंगणात उतरले असून, त्यात राष्ट्रवादीच्या शीतल राहुल साबळे, शिवसेनेच्या सुरेखा रमेश पाटील, कॉँग्रेसच्या मृणाली जयवंत घोरपडे यांचा समावेश आहे. त्याचबरोबर सातारारोड गणामध्ये राष्ट्रवादीचे डॉ. संजय मधुकर आवडे, शिवसेनेचे शहाजी गणपत कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे दिलीप साहेबराव चव्हाण, रिपब्लिकन सेनेचे नितीन एकनाथ रोकडे हे चौघे जण रिंगणात आहेत. या पार्श्वभूमीवर किन्हई व सातारारोड या दोन्ही गणांमध्ये अटळ असलेल्या मतविभागणीमुळे कोणाचे पारडे जड होणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
सातारारोड गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असून, या गटामध्ये राष्ट्रवादीच्या सुप्रिया किशोर फाळके आणि शिवसेनेच्या सारिका रत्नदीप फाळके यांच्यात सरळ लढत होत आहे. किशोर फाळके विद्यमान सरपंच व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, तर रत्नदीप फाळके शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. या गटामध्ये सातारारोड, पाडळीसह, खेड, किन्हई, भाडळे, अशी मोठी गावे असून, दोन्ही उमेदवार सातारारोड, पाडळी या एकाच गावातील असल्याने अधिक मते कोण खेचून घेणार, यावर यशापयशाचे गणित अवलंबून आहे. दोन्ही बाजूंनी प्रचाराचे नारळ फुटले आहेत. आता दोन्हीकडून प्रचारासाठी कोणते मुद्दे पुढे आणले जातात, याविषयी मतदारांमध्ये औत्सुक्य असून, निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रचाराला खऱ्या अर्थाने रंगत येणार आहे. दुसरीकडे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या किन्हई गणातील लढत देखील लक्षवेधी बनली आहे. याठिकाणी राष्ट्रवादीच्या शीतल राहुल साबळे, शिवसेनेच्या सुरेखा रमेश पाटील, कॉँग्रेसच्या मृणाली जयवंत घोरपडे मैदानात उतरल्या आहेत. सुरेखा पाटील यांनी यापूर्वी याठिकाणचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचबरोबर शीतल साबळे यांच्या सासू मंगल साबळे यांनीही याठिकाणचे प्रतिनिधित्व केले आहे. या पार्श्वभूमीवर सुरेखा पाटील व शीतल साबळे यांच्यातील सामना रंगतदार होईल, अशी अटकळ बांधली जात असतानाच याठिकाणी कॉँग्रेसच्या मृणाली घोरपडे यांच्या उमेदवारीने आणखी औत्सुक्य निर्माण झाले आहे.
तीन उमेदवार रिंगणात उतरले असल्याने याठिकाणी मतविभागणी कोणाच्या पथ्यावर पडणार आणि कोणाला नुकसानकारक ठरणार, याकडे लक्ष लागले आहे. सातारारोड गणातून या गावचेच माजी सरपंच डॉ. संजय आवडे राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या पत्नी आशा आवडे यांनी यापूर्वी पंचायत समितीचे सभापतिपद भूषविले आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून शहाजी कांबळे लढत देत आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे दिलीप चव्हाण, रिपब्लिकन सेनेचे नितीन रोकडे हे देखील रिंगणात आहेत. याठिकाणी देखील मतविभागणी अटळ असून, त्यावरच या गणातील यशापयशाचे गणित अवलंबून आहे.


चौकट
राष्ट्रवादी व शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला
सातारारोड गटामध्ये राष्ट्रवादीची ताकद विभागली होती; परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते खासदार नितीन पाटील यांची ताकद एकवटली आहे. दुसरीकडे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी देखील मोठी ताकद लावली आहे. त्यामुळे या गटातील व दोन्ही गणांतील निवडणूक राष्ट्रवादीसाठी जशी प्रतिष्ठेची आहे, तशीच ती शिवसेनेसाठीही प्रतिष्ठेची आहे.
----
छायाचित्रे
सुप्रिया किशोर फाळके
सारिका रत्नदीप फाळके
शीतल राहुल साबळे
सुरेखा रमेश पाटील

मृणाली जयवंत घोरपडे
डॉ. संजय मधुकर आवडे
शहाजी गणपत कांबळे
नितीन एकनाथ रोकडे
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''अंतिम निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचाच'', सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार का? मुख्यमंत्री काय म्हणाले?

Pune Police : पुणे शहरात पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; वरिष्ठ पदांवर सहा अधिकाऱ्यांची नेमणूक

Latest Marathi News Live Update : जिल्हा रुग्णालय रुद्रपूर आणि जिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालय पिथौरागढ वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश

Pune Accident: हडपसरमध्ये पुन्हा अपघात; टँकरने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू, मृताची ओळख पटली नाही

Land Measurement: अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा! जमीन मोजणीचे कठोर नियम शिथिल; महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT