doctor  sakal
पुणे

अपघातावेळी देणाऱ्या वैद्यकीय सेवेचे मिळणार प्रशिक्षण

'सेव्ह सेल्फ सेव्ह वन' अंतर्गत देशातील सुमारे एक लाख लोकांना अपघातादरम्यान तत्काळ देण्यात येणारी वैद्यकीय सेवेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र अस्थिरोग संघटना (Maharashtra Orthopedical Association) आणि पुणे ऑर्थोपेडिक सोसायटी (Pune Orthopedic Society) यांच्या वतीने अस्थि व सांधे आरोग्य दिनानिमित्त ‘सेव्ह सेल्फ सेव्ह वन’ या ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देशातील सुमारे एक लाख लोकांना अपघातादरम्यान तत्काळ देण्यात येणारी वैद्यकीय सेवेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अशी माहिती संघटनेचे सचिव व पुणे ऑर्थोपेडिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नारायण जे कर्णे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. चेतन प्रधान, डॉ. योगेश खंडाळकर, डॉ. नीलेश जगताप, डॉ. सचिन आबने आदी उपस्थित होते. (Save Self Save One Training immediate medical care during accident)

डॉ. कर्णे म्हणाले, ‘‘२०१९च्या आकडेवारीनुसार भारतातील संपूर्ण राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात एकूण चार लाख ४९ हजार एवढ्या अपघातांची नोंद आहे. यापैकी एक लाख ५१ हजार ११३ लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर कित्येक लोकांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या. रस्त्यावर होणाऱ्या अपघातात त्या व्यक्तीला पहिल्या एका तासात वैद्यकीय सेवा मिळणे अत्यंत गरजेची असते. मात्र अनेक लोकांना ते वेळेत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू होता. तसेच अशा वेळी इतर नागरिकांना ही यावेळी काय करावे याची माहिती नसते. त्यामुळे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक संस्था, कोचिंग क्लासेस, वाहतूक पोलिस, पोलिस मित्र आदींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम येत्या शनिवारपर्यंत (ता. ७) सकाळी सात ते रात्री दहा या कालावधित दिले जाणार आहे.’’

तर या प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेण्यासाठी तसेच याबाबतच्या अधिक माहितीसाठी officeofmoa@gmail.com या ई-मेलवर किंवा ७८७५४४६४७८ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन यावेळी पुणे ऑर्थोपेडिक सोसायटीतर्फे करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

Navodaya Vidyalaya Admission: नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाचे ऑनलाइन अर्ज सुरु; जाणून घ्या कसा आणि कुठे करावा

नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायण' सिनेमाच्या टीझरची चर्चा; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

SCROLL FOR NEXT