snake  Sakal Media
पुणे

मांडूळ जातीच्या दुर्मिळ सापाला जीवदान

सापाला जीवदानानंतर रविवारी सकाळी नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून देण्यात आले.

रवींद्र पाटे

नारायणगाव : तोंडाच्या भागा जवळ प्लास्टिकची रिंग अडकून संकटग्रस्त असलेल्या मांडूळ जातीच्या दुर्मिळ सापाला सर्पमैत्रिण, रेस्क्यू टीम सदस्य व वन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. अंधश्रद्धेमुळे मांडूळ जातीच्या सापाची तस्करी होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळे मांडूळ सापाची प्रजाती धोक्यात आली आहे. वास्तविक मांडूळ उपद्रव नसणारा बिनविषारी साप आहे. त्याच्या मातीमिश्रीत विष्टेमुळे जमीन सुपीक व भुसभुशीत होत असल्याने शेती पिकाच्या उत्पादनात वाढ होत असल्याने मांडूळाला शेतकऱ्याचा मित्र संबोधले जाते.

शनिवारी रात्री येथील गणपिर बाबा डोंगरा जवळ असलेल्या जुन्नर बाजार समितीच्या धना, मेथी बाजारात सुमारे साडेतीन फूट लांबीचा मांडूळ साप आढळून आला. या बाबतची माहिती शेतकऱ्यांनी सर्पमैत्रिण नागेश्वरी केदार व बिबट रेस्क्यू टीमचे सदस्य किरण वाजगे यांना सांगितली. पकडल्या नंतर या मांडूळ सापाच्या तोंडाच्या भागा जवळ प्लास्टिकची रिंग अडकली असल्याचे केदार व वाजगे यांना दिसून आले. प्लास्टिकची रिंग अतिशय कडक असल्याने व मांडूळाच्या शरीरा भोवती घट्ट बसल्याने ती काढणे अवघड होते. या मुळे केदार यांनी रिंग काढण्यासाठी मांडूळ माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रातील डॉ. निखिल बनगर व वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांच्या ताब्यात दिले. डॉ. बनगर यांनी मांडूळाच्या शरीरा भोवती घट्ट बसलेली प्लास्टिकची रिंग शिताफीने कापून काढली. रविवारी सकाळी नैसर्गिक अधिवासामध्ये त्याला सोडून दिले.सर्पमैत्रिण केदार, रेस्क्यू टीम सदस्य वाजगे व वन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बनगर यांच्या सतर्कतेमुळे मांडूळाला जीवदान मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai HC Chief Justice: सुप्रीम कोर्ट कॉलेजियमचा मोठा निर्णय! बॉम्बे हायकोर्टला नवे सरन्यायाधीश मिळणार; कुणाची नियुक्ती होणार?

Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! अखेर सायन आणि विद्याविहार उड्डाणपूल खुले होणार, उद्घाटनाचा मुहूर्तही ठरला

विद्यार्थ्यांसमोर झुकलं झारखंड सरकार; JPSC परीक्षा रद्द करण्याचं आश्वासन, ९० दिवसांत CID चौकशी

August Horoscope: अखेर प्रतीक्षा संपणार! ऑगस्टमध्ये ‘या’ राशींची रखडलेली कामं मार्गी, पैशांसह मिळणार मोठी खुशखबर

Marathi News Live Updates : माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला, गाडीवर चिखल, पाण्याच्या बाटल्या आणि चपला फेकल्या

SCROLL FOR NEXT