Pune_University 
पुणे

पुणे विद्यापीठाचा कोट्यवधींचा निधी राज्य सरकारकडे थकीत; रक्कम ऐकून बसेल धक्का!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फंडातील निधीला गळती लागल्याने यातील जमा निम्म्याने कमी होऊन ३०० कोटींपर्यंत आलेली आहे. असे असताना राज्य शासनाकडे पुणे विद्यापीठाची १४४ कोटी ६२ लाख ८८ हजार २५० रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. अधिसभा सदस्य डॉ. कान्हू गिरमकर यांनी यांसंदर्भात लेखी प्रश्‍न विचारला असून, त्यावर विद्यापीठाने उत्तरात ही माहिती दिली आहे.

पुणे विद्यापीठाला राज्य शासनाकडून शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधी दिला जातो. हा निधी वेळेवर मिळत नसल्याने त्याची थकबाकी दीडशे कोटींच्या जवळ जाऊन पोहोंचली आहे. पुणे विद्यापीठाकडून विविध विभागात तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी नियुक्त केले जातात, त्यांचे वेतन विद्यापीठ फंडातून दिले जाते. यासह इतर सुविधा फंडातून जात असल्याने हा निधीच्या नावाने असलेल्या ठेवी मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने विद्यापीठाच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

डॉ. गिरमकर यांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी विद्यापीठ फंडातून किती रक्‍कम खर्च केली जात आहे आणि आतापर्यंत किती खर्च झाला आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. त्यास विद्यापीठ प्रशासनाने गेल्या दोन वर्षाची आकडेवारी उपलब्ध करून दिली आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात विद्यापीठ फंडातून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी अनुक्रमे १७ कोटी ७९ लाख ५० हजार आणि २० कोटी ७४ लाख ४८ हजार इतका खर्च झाला आहे.

तर २०२०-२१ मध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी अनुक्रमे १६ कोटी ७८ लाख ६० हजार आणि २३ कोटी ३५ लाख ३५ हजार रुपये इतकी रक्‍कम खर्च झाली आहे. गेल्या दोन वर्षात विद्यापीठ फंडातून फक्त वेतनासाठीच ७८कोटी ६७ लाख ९४ हजार ७२६ रुपये खर्च झाल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phaltan Doctor Death Case: ''आयुष्यभर भाऊबीज साजरी करणार नाही, डॉक्टर भगिनीचा पुतळा उभारणार'', रामराजे नाईकांची घोषणा

Karnataka High Court : उच्च न्यायालयाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मोठा धक्का; संचलनाबाबत दिला महत्त्वाचा निर्णय, नेमकं काय घडलं?

Ayodhya Pune Flight: पुणेकर रामभक्तांसाठी आनंदाची बातमी! लवकरच सुरू होणार इंडिगोची पुणे-अयोध्या विमानसेवा ; जाणून घ्या डिटेल्स

Indian Railways : रेल्वेच्या प्रवासातील ‘खाद्य सेवा’ निकृष्ट, प्रवाशांच्या पैशांसह आरोग्याची लूट; निकृष्ट चहा, बेचव पदार्थ, पिण्याच्या पाण्याचा काळाबाजार

Ravindra Dhangekar : जैन बोर्डिंग ट्रस्टच्या वादात मोठा ट्विस्ट! संशयास्पद व्यवहाराची सखोल चौकशी व्हावी; रवींद्र धंगेकरांची थेट पोलिसांत तक्रार

SCROLL FOR NEXT