पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या अंतिम वर्षाच्या फेरपरीक्षेत अनेक विद्यार्थी तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा देऊ शकलेले नाहीत. त्यांना विद्यापीठाने आणखी एक संधी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट वेलफेअर असोसिएशनने केली आहे.
पुणे विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा घेताना त्यात अनेक विद्यार्थ्यांना अडथळे आले. पेपर सबमीट झाला नाही, प्रश्न किंवा उत्तरांचा पर्याय दिसला नाही, लाॅगइन झाले नाही, यासह इतर अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता होती. त्यामुळे विद्यापीठाने ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत फेरपरीक्षा घेतली. यास ३४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
ज्या विद्यार्थ्यांनी त्यासाठी नोंदणी केली होती, त्यांना ई-मेलवर लाॅगइन आयडी पाठवून देण्यात आला, पण यामध्ये देखील लाॅगइन न होणे, मराठीचा पेपर इंग्रजीत दिसणे, काहींना तर ई-मेल आलेले नाहीत, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
महाराष्ट्र स्टुडंट वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष वैभव एडके म्हणाले, फेरपरीक्षेत अडचणींमुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. आमच्या संघटनेकडे सुमारे २०० विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या आहेत. या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने आणखी एक संधी द्यावी, अशी मागणी विद्यापीठाकडे सोमवारी (ता.९) करण्यात येणार आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.