Savitribai Phule Pune University esakal
पुणे

Bribe Case : पुणे विद्यापीठात क्लर्कने मागितली ५०० रुपये लाच; तक्रारीसाठी खर्च ४०० रुपये

सकाळ डिजिटल टीम

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यापीठातील एक विद्यार्थ्याला क्लर्कने ५०० रुपयांची लाच मागितली. याची तक्रार करण्यासाठी विद्यार्थ्याला तब्बल ४०० रुपये खर्च आल्याचं समोर आलं आहे. विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, तो मागील महिनाभरापासून ट्रान्सफर सर्टिफिकेटसाठी विद्यापीठात चकरा मारत आहेत. (savitribai phule pune university news in Marathi)

ट्रान्सफर सर्टिफिकेटसाठी तयार करण्यासाठी क्लर्कने ५०० रुयांची मागणी केली. त्यानतंर विद्यार्थ्याने याबाबत तक्रार करण्याचा निर्णय़ घेतला. ही तक्रार करण्यासाठी विद्यार्थ्याला प्रतिज्ञापत्र तयार करण्यास सांगण्यात आलं. त्यासाठी विद्यार्थ्याला ४०० रुपये खर्च आला.

दरम्यान केवळ टान्सफर सर्टिफिकेट मिळविण्यासाठी एवढा त्रास सहन करावा, यामुळे विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होतोय. पीडित विद्यार्थ्याने सांगितलं की, मला टीसी मिळविण्यासाठी क्लर्कला पैसे देण्यास भाग पाडण्यात आलं. मला टीसी एका संस्थेत जमा करायची होती. मात्र माझ्यासारखा त्रास दुसऱ्या कोणाला होऊ नये, म्हणून आपण तक्रार दाखल केल्याचं त्याने सांगितलं.

या घटनेची दखल प्रभारी कुलगुरू संजीव सोनवणे यांनी घेतली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, अस सोनवणे यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: सांडपाणी भागवणार मुंबईकरांची तहान, रिसायकल करून पाणी देण्याची BMCची योजना

Kolhapur Ambabai Temple : श्री अंबाबाईच्या ओटीत साडीऐवजी कागदाची रद्दी; भाविकांच्या श्रद्धेशी खेळ; प्रशासनाचे दुर्लक्ष

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत रामललाच्या दर्शनाची वेळ आणि नियम अचानक बदलले; आता VIP पास सुद्धा बंद, काय आहे कारण?

'मराठी सिनेमासाठी काय करतोय?' विलासराव देशमुखांनी रितेशला विचारलेला प्रश्न, वडिलांची इच्छा सांगताना म्हणाला...'सध्या मराठी भाषेला..'

Chakan News : काळ्या ऑइलवरील शेगड्यांकडे कल; चाकण परिसरामधील छोट्या हॉटेलचालकांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT