Savitribai Phule Pune University files case against  fake exam circular
Savitribai Phule Pune University files case against fake exam circular 
पुणे

पुणे विद्यापीठाच्या परीक्षांसंदर्भात बनावट परिपत्रक प्रकरणी गुन्हा दाखल

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांसंदर्भात बनावट परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संतोष देवराम मदने (वय ४४, रा. पुणे विद्यापीठ) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. कलम ४२० आणि आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी २७ मार्च २०२० रोजी परिपत्रक काढून  १४ एप्रिल २०२० पर्यंतच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, ३१ मार्च रोजी सोशल मिडीयावर विद्यापीठाने ५ एप्रिल पासून सर्व परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याचे परिपत्रक व्हायरल केले. यासंदर्भात मनोहर कानवडे यांनी महेश काकडे यांच्याकडे चौकशी केली.

Coronavirus : पुणेकरांची घरपोच आरोग्य तपासणी; महापालिकेची मोहीम

काकडे हे परिपत्रक वाॅट्सअॅपवर मागवून घेऊन त्याची खात्री केली असता, हे परिपत्रक बनावट असल्याचे स्पष्ट केले. खोडसाळपणाने परीक्षेसंबंधी परिपत्रक वाॅट्सअॅप व इतर सोशल मीडियावर व्हायरल करून विद्यापीठ व विद्यार्थ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास चतु:श्रृंगी पोलिस करत आहेत. 

गुटखा पोहोचतो दुकानात

दरम्यान, गेल्या महिन्याभरात पुणे विद्यापीठाच्या नावाने तीन बनावट परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल केले गेले होते. परंतू, विद्यापीठाने याकडे दुर्लक्ष करत कायदेशीर कारवाई टाळली होती. मात्र, हे प्रकार वारंवार घडत असल्याने यावेळी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT