Pune-University 
पुणे

पुणे विद्यापीठाने 'या'साठी नेमली तज्ज्ञांची समिती; काय आहे कारण?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्ष वगळता अन्य वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल लावण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र निकाल लावण्यापूर्वी त्यात त्रुटी राहून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी प्रत्येक अभ्यासक्रमानुसार तज्ज्ञांची समिती नेमली आहे. या समितीकडून हिरवा कंदील मिळाला की निकाल लावण्यात येणार आहे. 

पुणे विद्यापीठाने राज्य शासनाच्या निर्णयानुसार अंतिम वर्ष वगळता इतर वर्षाचे निकाल लागण्यासाठी यापूर्वीच प्रक्रिया सुरू केली. प्रत्येक महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ऑनलाईन मागविण्यात आले आहेत. 
या विद्यार्थ्यांना ५० टक्‍के अंतर्गत मूल्यमापनावर आणि ५० टक्‍के पूर्वीच्या सत्रातील परीक्षेचे गुण यावरून गणितीय पद्धतीने सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करून पुढील वर्षात प्रवेश दिला जाणार आहे. 

परीक्षा मंडळाकडून निकाल लागण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे. पण यावर्षी दरवेळेपेक्षा वेगळ्या पद्धतीने निकाल लावले जात असल्याने यात काही त्रुटी राहू नये यासाठी ही खबरदारी घेतली आहे. यासाठी संबंधित अभ्यासक्रमांच्या अधिष्ठातांच्या अध्यक्षेखाली चार-पाच जणांची समिती नेमण्यात आली आहे.

निकाल जाहीर करण्यापूर्वी सॅपल म्हणून काही निकाल तपासतील. यात गुण योग्य पद्धतीने दिले गेले आहेत का?, सरासरी बरोबर आली आहे का?, गेल्यावर्षीचा निकाल व या निकालात मोठा फरक आहे की थोडा आहे हे पाहिले जाईल. मोठा फरक असेल व कुठे चुकले आहे का याची पडताळणी समिती करणार आहे. योग्य निकाल असल्याची खात्री झाल्यानंतरच निकाल लावला जाणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"यावर्षी थोड्या वेगळ्या पद्धतीने निकाल लावले जात आहेत. त्यामुळे यात त्रुटी राहू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. निकाल लावण्यापूर्वी संबंधित अभ्यासक्रमाचे तज्ज्ञ निकालाचे सँपल तपासणी करतील. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हातात योग्य निकाल देता येऊ शकणार आहे. "
- डॉ. पराग काळकर, अधिष्ठाता, पुणे विद्यापीठ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC मुख्यालयात रात्रीस खेळ चाले! निवडणूक जाहीर होताच प्रशासनाचा रात्रभर 'कारभार', आचारसंहिता भंग?

Ashes Test: पुन्हा राडा! ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अम्पायरला घेरले; मिचेल स्टार्कचे वादग्रस्त विधान स्टम्प माईकने टिपले, Viral Clip

Latest Marathi News Live Update : पुणे काँग्रेसभवन मध्ये इच्छुकांची मोठी गर्दी

Bank Holiday : आजपासून 5 दिवस देशभरातील बँका बंद! राज्यातील बँकाही 4 दिवस बंद; कधी ते जाणून घ्या?

विदर्भाचे दोन्ही पोट्टे IPL मध्ये चमकणार! SRH-Mumbai Indians कडून उतरणार मैदानात, विदर्भाच्या क्रिकेटचा नवा अध्याय!

SCROLL FOR NEXT