Professors 
पुणे

हंगामी शिक्षक म्हणून काम करणाऱ्या प्राध्यापकांना पुणे विद्यापीठाचा दिलासा!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाविद्यालयांमध्ये हंगामी शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या प्राध्यापकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिलासा दिला आहे. कोरोनामुळे नव्याने भरती प्रक्रिया करता येत नसल्याने या प्राध्यापकांना एका वर्षाची मुदतवाढ दिली आहे. 

शैक्षणिक वर्ष २०१९-२० यासाठी काही महाविद्यालयास काही शिक्षकी पदांना एका शैक्षणिक वर्षासाठी मान्यता देण्यात आली होती. मात्र, कोरोनामुळे नियुक्‍तीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. अशा महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे या शिक्षकांना मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यामुळे नियमित पदभरती होईपर्यंत हंगामी शिक्षकांना मुदतवाढ देण्याचा धोरणात्मक निर्णय कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विशेष बाब म्हणून विद्यापीठाने घेतला आहे.

शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेल्या शिक्षकांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता घेतली आहे. अशाच शिक्षकांना २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी नव्याने नियुक्‍ती दिलेले आदेश, रूजू अहवाल व संस्थेच्या शिक्षक मान्यतेची मुदतवाढ घेण्यासाठी केलेल्या ठरावासह विद्यापीठाकडे ३१ जुलैपर्यंत पाठविणे आवश्यक आहे. त्यानंतर येणाऱ्या प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही.

तसेच ज्या पदांना विद्यापीठाची शिक्षकीय मान्यता शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी घेतलेली नाही, अशी पदे भरताना संस्था अथवा महाविद्यालयाने शिक्षकीय पदे भरण्यासाठी विहित प्रक्रियेचा अवलंब करणे बंधनकारक राहील. या शिक्षक नियुक्‍तीस काही कायदेशीर व आर्थिक बाबी उद्‌भवल्यास त्यास संपूर्णत: संबंधित संस्था तथा महाविद्यालय जबाबदार राहतील, असे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने स्पष्ट केले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart मध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! हे नियम माहिती नसतील तर नुकसान होऊ शकते, खरेदीपूर्वी नक्की वाचा!

Kolhapur Police Recruitment : कोल्हापुरात पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षा उद्या; ८८ पदांसाठी ११३५ उमेदवार मैदानात

Latest Marathi News Live Update : परळीच्या धारावती तांड्यावर 16 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना

Multibagger Stock: ₹11 चा शेअर थेट ₹1100 वर! 1 लाखाचे झाले तब्बल 1 कोटी 10 लाख; 5 वर्षांत गुंतवणूकदार मालामाल

Kolhapur Water Project : ‘धामणी’चे अतिरिक्त पाणी करवीर तालुक्याला द्यावे; तर, कोल्हापूरला पोलिस आयुक्तालय हवे - नरके

SCROLL FOR NEXT