Students_Exam 
पुणे

अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो, ऑफलाइन परीक्षेसाठी निवडा परीक्षा केंद्र!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षेचे नियोजन सुरू केले असून, ऑफलाइन परीक्षा देणाऱ्यांची संख्या 50 हजाराच्या जवळ जाण्याची शक्‍यता आहे. यासाठी पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यात 55 महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र उपलब्ध करून दिले जाणार आहेत. कोणत्या केंद्रावर परीक्षा द्यायची आहे, हे विद्यार्थ्यांना निवडावे लागणार आहे.
विद्यापीठाने ऑनलाइन आणि ऑफलाईन परीक्षेसाठी पर्याय निवडण्यास सांगितले आहे, त्यामध्ये 2 लाख 48 हजार विद्यार्थ्यांपैकी सुमारे 1 लाख 85 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेला पसंती दर्शविली आहे. उर्वरित विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार आहे.

या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात ऑप्टिकल मार्क रेकग्नायझेशन (ओएमआर) शीट उपलब्ध करून दिली जाणार आहे. दरम्यान अद्यापही 10 हजार विद्यार्थ्यांनी कोणताच पर्याय दिला नाही. अशांसाठी सोमवारी (ता. 21) सायंकाळपर्यंतची मुदत देण्यात आली असून अन्यथा या सर्वांना ऑफलाइन परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे ऑफलाइन परीक्षा देणाऱ्या याविद्यार्थ्यांची संख्या 50 हजाराच्या जवळपास जाणार आहे.

50 हजार विद्यार्थ्यांपैकी त्यातील 22 ते 23 हजार जण पुणे जिल्ह्यातील आहेत. ही संख्या मोठी असल्याने कोरोनाच्या काळात त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. सोशल डिस्टन्स ठेवून परीक्षा घेणे आव्हान आहे. यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळच, गावाजवळील परीक्षा केंद्र निवडण्याची संधी दिली जाणार आहे. यासाठी विद्यापीठाचे नियोजन सुरू आहे.

परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, "ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षेचा पर्याय निवडला आहे, त्यांच्या परीक्षेसाठी सुमारे 55 केंद्रात व्यवस्था केली जाईल. गरजेनुसार केंद्रांची संख्या वाढवली जाईल. अद्याप ज्यांनी ऑनलाइन आणि ऑफलाइनचा पर्याय निवडला नाही, त्यांच्यासाठी सोमवारची अखेरची मुदत आहे, त्यांनी पर्याय निवडला नाही, तर ऑफलाइन परीक्षा द्यावी लागेल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

Flight Incident: 180 प्रवाशांचा जीव... '9/11' सारख्या हल्ल्याचा धोका; फ्लायदुबईच्या भारतीय कॅप्टनमुळे टळला मोठा अपघात, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT