Students_Result 
पुणे

'एमसीक्यू' विद्यार्थ्यांच्या पथ्यावर; तांत्रिक अडचणीनंतरही निकाल वाढला

ब्रिजमोहन पाटील

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल चॉइस क्वेश्चन-एमसीक्यू) पद्धतीने घेतल्याने ही पद्धत विद्यार्थ्यांच्या पथ्यावर पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला, पण जवळपास सर्वच अभ्यासक्रमाचा निकाल पूर्वीच्या तुलनेत २० ते २५ टक्के वाढल्याचे समोर आले आहे.

एकंदरीत विद्यापीठ आणि विद्यार्थी या दोघांनाही दिलासा मिळाला आहे. 
'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा पारंपरिक पध्दतीने घेता येणे शक्य नव्हते. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून 'एमसीक्यू'  पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. 

पुणे विद्यापीठाने ऑक्टोबर महिन्यात सव्वाशेपेक्षा अभ्यासक्रमांच्या आणि २ हजार ९०० विषयांच्या परीक्षा घेतल्या. यात जवळपास २ लाख जणांनी ऑनलाईन, तर ५० हजारजणांनी ऑफलाइन परीक्षा दिली. 'एमसीक्यू' पध्दतीने परीक्षा घेण्याची पहिलीच वेळ असल्याने विद्यापीठासह विद्यार्थ्यांना परीक्षा देताना तांत्रिक अडचणींना सामोरे  जावे लागले. काहींना एकाच विषयाचा पेपर दोन ते तीन वेळा सोडवावा लागला, काहींचे सोडवलेले प्रश्न सबमिट झाले नाहीत. यासह इतर अडचणींमुळे निकालावर परिणाम होणार असल्याची भीती विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली  जात होती. याचा फटका काही विद्यार्थ्यांना बसला बसून, त्यांचा मोबाईल अॅपमधील डेटा परीक्षेच्या सर्व्हरशी सिंक्रनाॅईज न झाल्याने परीक्षेला अनुपस्थिती पडली आहे. तर अनेकांनी पूर्ण प्रश्न सोडवून शून्य गुण मिळाले आहेत. 

एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे विद्यापीठाने जवळपास सर्व अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर केले. यामध्ये विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा चांगले गुण पडले आहेत, विद्यार्थी नापास होण्याचे प्रमाण होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले अाहे. साधारणपणे विद्यापीठाचा निकाल साठ टक्क्यांच्या जवळपास लागत असतो, पण यंदाच्या निकालात २० ते २५ टक्के वाढ होऊन ८० ते ८५ टक्के निकाल निकाल लागला आहे. तर अनेक अभ्यासक्रमांचे शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

" पुणे विद्यापीठाने जवळपास सर्व अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले आहेत 
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाचा निकाल ८० ते ८५ टक्के लागला असून, २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जे विद्यार्थी नापास झाले आहेत, त्यांची परीक्षा नियमित सत्र परीक्षेच्या वेळेस घेण्यात येतील."
 - डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मुल्यमापन मंडळ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi custody : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईपर्यंत मुंबई पोलीस का पोहोचू शकत नाहीत?; 'साबरमती'तून ताब्यात घेण्यास बंदी का?

Mumbai Local: मुंबईकरांनो लोकलचा लेटमार्क विसरा, आता ताशी १०० किमी वेगाने गाड्या धावणार; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates: पुणे शिक्षक मतदारसंघात पदवीधरांपेक्षा अधिक मतदान; दुपारी २ वाजेपर्यंतची आकडेवारी समोर

karnataka Politics : ''मेटा स्मार्ट ग्लास घालून माझं स्टिंग ऑपरेशन करण्याचा प्रयत्न'', मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ

Delhi Protests: सरकारला 'सीजेपी'चा धसका! आंदोलन पुन्हा पेटणार? गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT