set exam sakal
पुणे

Pune University : सेट परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध

२६ मार्चला परीक्षा; तब्बल एक लाख १९ हजार उमेदवारांचे अर्ज

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) २६ मार्च रोजी घेण्यात आहे. यासाठी एक लाख १९ हजार ८१३ उमेदवारांनी अर्ज केला असून, या सर्व उमेवारांना त्यांच्या लॉगइन मध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या यांच्या मान्यतेने राज्य शासनाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी सेट आयोजित करण्यात येते. यंदाची ३८ वी परीक्षा ही २६ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. परिक्षेसाठीची प्रवेश पत्र दिनांक १६ मार्च पासून उमेदवारांच्या लॉगइन मध्ये उपलब्ध केली आहेत.

तसेच आवश्यक त्या सुचनेसह प्रवेश पत्र विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत ई मेल वर देखील पाठविण्यात आले असल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव तथा सेटचे सदस्य सचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी सांगितले. प्रवेशपत्र व मूळ ओळखपत्र या शिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. २६ मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी सकाळी दहा वाजल्यानंतर कोणत्याही सबबीवर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी दोन तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे असे सेट विभागाकडून पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे

महत्त्वाचे :

  • सेटचे आयोजन : १७ शहरांत

  • उमेदवारांची संख्या : १ लाख १९ हजार ८१३

  • संकेतस्थळ : https://setexam.unipune.ac.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT