Students_Exam 
पुणे

Final Year Exam : पुणे विद्यापीठाची फेरपरीक्षा आजपासून

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत झालेल्या तांत्रिक गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी फेर परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा गुरुवार (ता.५) पासून सुरू होत असून, यासाठी 26 हजार विद्यार्थी अपेक्षित आहेत. 

'कोरोना'मुळे लांबणीवर पडलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षा लवकर संपविण्यासाठी बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल चॉइस क्वेश्चन-एमसीक्यू) पद्धतीने घेण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाने घेतला. ही परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून घेण्यात येणार असल्याने त्यासाठी खासगी कंपनीची निवड करण्यात आली. या परीक्षेसाठी २ लाख ५० हजार विद्यार्थी बसणार होते, त्यातील सुमारे १ लाख ९५ हजार विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार होते. १२ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या परीक्षेला ९७ टक्के विद्यार्थी उपस्थित राहिल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. 

ऑनलाइन परीक्षेत लॉगइन न होणे, प्रश्न किंवा उत्तरांचे पर्याय न दिसणे, आकृत्या न दिसणे, सोडवलेला पेपर सबमिट न होणे, तसेच सोडवलेल्या प्रश्नांपैकी काही प्रश्न गायब होणे अशा समस्यांना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागले होते. या सदोष प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होणार होता. त्यामुळे या परीक्षा पद्धतीवर टीकेची झोड उठली. त्याची दखल  घेत विद्यापीठाने गुगल फाॅर्म आणि ईमेल द्वारे विद्यार्थ्यांच्या तक्रारींची नोंदणी करून घेतली. यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी तक्रारी नोंदविल्या आहेत. 

विद्यापीठाने तक्रारींचे वर्गीकरण करून २६ हजार विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेसाठी वेळपत्रक तयार केले. शिक्षणशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, मानसनिती व समाजविज्ञान, शारीरिक शिक्षण अभ्यासक्रम या अभ्यासक्रमांची परीक्षा ५ नोव्हेंबरला होतील. वाणिज्य, व्यवस्थापन व विधी अभ्यासक्रमाची परीक्षा ६ नोव्हेंबर आणि कला आणि विज्ञान अभ्यासक्रमाची परीक्षा ७ नोव्हेंबरला होणार आहे. या सर्व परीक्षा सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहेत. या परीक्षेत पुन्हा तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेतली असल्याचे, परीक्षा विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT