पुणे

शाळा, सरकारकडून बालरंगभूमीची उपेक्षा!

सकाळवृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात बालरंगभूमी अजूनही ‘प्रायोगिक’ अवस्थेत आहे. शाळा पातळीवर अनास्था आणि सरकारकडून होणाऱ्या उपेक्षेबरोबर या रंगभूमीला खडतर प्रवास करावा लागतो आहे.

विश्‍व बालरंगभूमी दिन नुकताच झाला. त्यानिमित्ताने काही कार्यक्रम झाले; पण खरंच रंगभूमी उमलली का, असा  जाणकारांचा प्रश्‍न आहे. व्यक्तिमत्त्व विकास, सादरीकरणाची कला, संवाद ही सर्व कौशल्ये बालरंगभूमीतून मुलांमध्ये रुजविता येतात; पण तिला ना शाळेत स्थान, ना सरकारच्या मनात! केवळ बालनाट्य स्पर्धा घेऊन या रंगभूमीला ऊर्जा मिळणार नाही, असे मत या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत. 

महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या शुभांगी दामले सांगतात, ‘‘ अनेक वर्षे ‘ग्रिप्स’च्या माध्यमातून बालकांसाठी काम करतो. नाटकाचा विषय बालकांचा असला तरी बालकांची भूमिका मोठी मुलेच करतात. शाळांना सुट्या लागल्यानंतरही अनेक प्रायोगिक गोष्टी चालतात. ही सुटीतील चळवळ नाही. वर्षभर काम झाले पाहिजे. शाळा, शिक्षक यांना प्रशिक्षण देऊन शाळा स्तरावर काम झाले, तर रंगभूमीला चांगले दिवस येतील. त्यासाठी शाळांनी पुढे यायला हवे.’’

नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमोद पारखी चाळीस वर्षे बालरंगभूमीशी संबंधित आहेत. ते म्हणतात, ‘‘अनेक अडचणी या रंगभूमीसमोर आहेत. समजदार प्रेक्षक,चांगले कलाकार निर्माण करायचे असतील, तर बालरंगभूमीला महत्त्व द्यावेच लागेल.'

शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा
बालसाहित्यकार संगीता बर्वे यांनीदेखील नाट्यकला ही शालेय अभ्यासक्रमात आणण्याची गरज व्यक्त केली. ‘‘संवाद, सादरीकरण, परस्परांशी सलोखा शिकविणारी आणि चांगला माणूस घडविणारी ही कला आहे. गणित आणि शास्त्र हे विषय महत्त्वाचे आहेतच; त्याबरोबर मुलांना व्यक्त होता येईल, अशी कलादेखील शिकविली गेली पाहिजे.’’

बालरंगभूमीपुढील आव्हाने
  आईबाबा दोघेही नोकरीत ‘बिझी.’ मग मुलांना या रंगभूमीकडे कोण आणणार?
  सुटीच्या काळात कार्यशाळा होतात; पण त्या काळात नाट्यगृहे मिळत नाहीत.
  शाळांचा कल अभ्यासक्रम पूर्ण करणावर असतो. त्यामुळे नाटक हा विषय दुर्लक्षित
  जगभर ‘थिएटर इन स्कूल’ चळवळ सुरू; पण सरकारी स्तरावर या रंगभूमीची उपेक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाने पाडलेलं हैदराबादच्या फलंदाजीला खिंडार, पण कॅप्टन कमिन्स फटकेबाजीने मुंबईसमोर 174 धावांचं लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT