school
school 
पुणे

भोलेनाथा, शाळेभोवती तळे न साचताही सुटी मिळाली!

ज्ञानेश्वर रायते

भवानीनगर (पुणे) : एकीकडे अतिवृष्टीने हैराण झालेले धरण भागातील नागरिक; तर दुसरीकडे धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे त्रस्त झालेले पुणे- पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक, अशी परिस्थिती सध्या आहे, मात्र, या आपत्तीतही बारामती, इंदापूर तालुक्‍यात सलग दोन दिवस शाळेला "विनाकारण' सुटी मिळाली. त्यामुळे या भागातील विद्यार्थी कमालीचे खूष झाले. जिल्ह्यात इतरत्र असलेल्या पूरस्थितीने त्यांना सलग तीन दिवस सुटी मिळाली. 

पुणे जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे अनेक ठिकाणी नद्या, ओढ्यांना महापूर आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्कालीन व्यवस्था म्हणून जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना सोमवारी सुटी जाहीर केली, त्यानंतर मंगळवारीही सुटी जाहीर केली. ज्या भागात सातत्याने पाऊस पडत आहे, तिथे ही सुटी योग्यच होती, मात्र बारामती व इंदापूर तालुक्‍यात नदीकाठचा ठराविक अपवाद वगळता इतर सर्वच भाग कोरडाठाक आहे. तेथे मात्र केवळ जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश म्हणून शाळांना सुटी देण्याची वेळ आली.

इंदापूर व बारामतीतील विद्यार्थी खूष 

रविवारची सुटी झाल्यानंतर सोमवारी नेहमीप्रमाणे शाळेत जावे लागणार असलेल्या बारामती व इंदापूर तालुक्‍यातील शाळांमधील मुलांना अचानक "बोनस' मिळाला. सोमवारी सुटी मिळाली, त्यापाठोपाठ आजही सुटी मिळाली. रविवारच्या हक्काच्या सुटीबरोबर हे दोन दिवस मिळून सलग तीन दिवस या मुलांना सुटी मिळाली. त्यामुळे बच्चेकंपनी चांगलेच खुशीत आहेत. या दोन्ही तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विद्यालये, खासगी शाळांना दोन दिवसांची सुटी देण्यात आली. काही शाळांनी आपली नियोजित दहावीची पहिली घटक चाचणीही केवळ जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाने पुढे ढकलली. एकंदरीत न झालेल्या आपत्तीसाठी ठरलेली ही इष्टापत्तीही मोठ्यांमधील पूर, काश्‍मीरच्या चर्चेबरोबर खमंग फोडणी ठरली. 

इंदापूर तालुक्‍यातील शंकरराव पाटील विद्यालय हे नदीकाठच्या भागात आहे. या हायस्कूलच्या पायरीपर्यंत पाणी आले होते. या एका शाळेचा अपवाद वगळता इतरत्र पाऊस नसतानाही दोन दिवसांची सुटी मिळाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT