The school need donation of Android phones for the online education of poor children 
पुणे

तुमचा जुना अँड्रॉइड फोन करा शाळेला दान अन् गरीब विद्या्र्थ्यांची करा मदत!

सकाळवृत्तसेवा

पुणे : 'कोरोना'मुळे शाळा कधी सुरू होईल माहिती नाही, त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय समोर आला आहे. मात्र, असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांच्याकडे एंराॅईड फोन नसल्याने ते ऑनलाईन शिक्षण ही घेऊ शकत नाहीत. त्यासाठी खडकी शिक्षण संस्थेने नागरिकांना त्यांचे जूने एंराॅईड स्मार्टफोन दान करण्याचे आवाहन केले  आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
   
खडकी शिक्षण संस्थेच्या आलेगावकर माध्यमिक विद्यालयात सुमारे २५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर 'जीएमआय' या मुलींच्या माध्यमिक विद्यालयात सुमारे ३०० विद्यार्थीनी आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी हे झोपडपट्टी भागातील आहेत. त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे ते नवीन मोबाईल घेऊ ही शकत नसल्याने शिक्षणापासून वंचित रहात आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बरेच नागरिक नवीन अँड्रॉइड फोन विकत घेताना आपला जुना फोन एक्सचेंज ऑफरमध्ये खूप कमी किंमतीत दुकानदारांना देता. पण हा जुना अँड्रॉइड फोन आमच्या शाळेला देणगी म्हणून दिली तर कोविड मुळे निर्माण झालेल्या सद्य परिस्थितीत, गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शाळांमार्फत आॅनलाईन शिक्षण देण्यासाठी त्याचा उपयोग होईल. तुमच्या मदतीमुळे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची संधी मिळेल, असे आवाहन संस्थेने केले आहे. 

'शरद पवारांबाबतच्या 'त्या' वक्तव्यावरून गोपीचंद पडळकर यांनी तात्काळ माफी मागावी'​

आलेगावकर माध्यमिक विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका मनीषा राठोड म्हणाल्या, "काही वर्गात ९ जणांकडे तर काही वर्गात १५ जणांकडेच स्मार्ट फोन आहे. अशा प्रकारे आलेगावकर शाळेतीव किमान १०० विद्यार्थी विद्यार्थी आॅनलाईन शिक्षणापासून वंचित रहात आहेत. त्यांना स्मार्ट फोन उपलब्ध झाल्यास ती मोठी मदत ठरणार आहे. यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. 

सौ मनीषा राठोड -9822118082
मोहन लोणकर -9822892017
दिवाकर  पाटील- 9561606334
संतोष गाडे - 9767414873

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT