school1.jpg 
पुणे

अरे बापरे ! पुण्यातील `या` शाळेने राज्य सरकारच्या आदेशाला दाखविली केराची टोपली

सकाळवृत्तसेवा

वाघोली  (पुणे) : शाळा, महाविद्यालयांनी शुल्क भरण्याबाबत सक्ती करू नये तसेच शुल्क वाढवू नये असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. मात्र, तरी देखील वाघोलीतील जे. एस. पी. एम संस्थेच्या प्रोडिजी स्कूलने पालकांना शुल्क भरण्याबाबत पत्र पाठवून शुल्क भरण्यास सांगितले आहे. 

लॉकडाउनच्या काळात स्कूलने ऑनलाइन क्‍लासेस घेतले. त्याला मुलांनीही उत्तम प्रतिसाद दिला. स्कूलचेही ही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मेंटेनन्स कर्मचारी आदींचे वेतन सुरू आहे. यासाठी तुमच्या शुल्कची गरज आहे. येणाऱ्या नवीन वर्षाचे शुल्क तुम्ही भरल्यास त्याचा खूप फायदा स्कूलला होईल. मुलांचे निकाल लवकरच जाहीर होतील.

नवीन वर्षाचे ऑनलाईन क्‍लासेस 15 जून पासून सुरू होतील. कृपया पालकांनी ऑनलाईन शुल्क जमा करावे. असे पालकांना पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, वाघोली व परिसरातील शाळा, महाविद्यालये यांनी शुल्क वाढू नये तसेच शुल्क जमा करण्याची सक्ती करू नये. अन्यथा त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी दिला आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

याबाबत त्यांनी शाळा व महाविद्यालयांना पत्र पाठविले आहे. वाघोलीत 100 पेक्षा अधिक शाळा व महाविद्यालये आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन असताना वाघोली व परिसरातील काही शाळा, शैक्षणिक संस्थांनी शुल्क भरण्यासंदर्भात पालकांना सक्ती केली असल्याच्या तक्रारी आल्याचे कटके यांनी सांगितले. 
 

सध्या लॉकडाउन असल्याने उत्त्पन्नाचे साधन बंद आहे. त्यामुळे सध्या शुल्क भरणे शक्‍य नाही. स्कूलने सक्ती करू नये. 
- एक पालक 
 

लगेच शुल्क भरणे सक्तीचे नाही. ज्यांना शक्‍य आहे त्यांनी आता भरावे. बहुतांश आयटी कंपनीचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्यामुळे जे पालक आयटीमध्ये आहेत. त्यांनी शुल्क भरून सहकार्य करावे. ज्यांना सध्या शक्‍य नाही त्यांनी स्कूल सुरू झाल्यावर टप्याटप्याने भरावे. शिक्षक, शिक्षकतेर कर्मचारी व अन्य संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन सुरू असून मेंटेन्सचाही खर्च सुरूच आहे. त्यामुळे पालकांनी शुल्क दिल्यास आर्थिक घडी व्यवस्थित राहील. 
-डॉ. विवेक कायंदे, संकुल संचालक, जे. एस. पी. एम, वाघोली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Patil: एकनाथ शिंदेंकडून संजय पाटलांची पाठराखण, पण फडणवीसांनी आरसा दाखवला; शिवसेना नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा पाढाच वाचला

INDW vs BAN W Live: गचाळ क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाची जगासमोर नाचक्की झाली; बांगलादेशने योग्य वेळी संधी साधली अन्...

Air India IndiGo Incident: अहमदाबाद विमानतळावरील अपघात टळला; दोन विमानं अचानक समोरासमोर; नेमकं काय घडलं?

INDA vs SLA Test: ऋतुराज गायकवाड, देवदत्तने संधी गमावली; साई सुदर्शनची सेंच्युरी, तर ध्रुव जुरेल, शेख राशीदची दमदार फिफ्टी

Pachod Rain : दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाची दमदार हजेरी; शेतशिवार गजबजले, बियाण्यांच्या दुकानांत वाढली गर्दी

SCROLL FOR NEXT