Pune_University 
पुणे

पुणे विद्यापीठात 'स्कूल सिस्टिम'; आता तुमच्या आवडीचा विषय शिकता येणार

ब्रिजमोहन पाटील

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ज्या विभागात प्रवेश मिळाला आहे तेथेच शिक्षण घेता येईल, इतर विभागातील आवडता विषय शिकता येणार नाही, अशा नियमांच्या भिंतीचा अडसर दूर होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ अभ्यासक्रमासह इतर पूरक विषय देखील शिकता येतील, त्यादृष्टीने वेळापत्रकाची रचनाही केली जाईल. विद्यापीठात 'स्कूल सिस्टिम' विकसित करण्यात आल्याने हे शक्‍य झाले आहे.

देशातील केंद्रीय विद्यापीठांमध्ये 'स्कूल सिस्टिम'ने शिक्षण देण्याची पद्धत आहे. पुणे विद्यापीठात 'स्कूल सिस्टिम' असावी अशी सूचना 'नॅक'तर्फे करण्यात आली होती. त्यानुसार गेल्या महिन्यांपासून कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी याचे नियोजन करून, स्कूलची निर्मिती केली आहे. कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी याबाबत नुकतेच आदेश काढले आहेत. यात 52 विभाग, अध्यासन केंद्र व अभ्यास केंद्र निहाय 18 स्कूल स्थापन करून प्रत्येक स्कुलसाठी एका संचालकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

स्कूलचा उद्देश :-
- समान अभ्यासक्रम, मूलभूत ज्ञान सारखे असणारे विषय एकत्र शिकवणे
- मनुष्यबळ, भांडवल आणि निधीचा योग्य वापर, पुर्नखर्च टाळणे
- केवळ एकाच विभागाचा विचार न करता 'स्कूल'मधील सहभागी सर्व विभागांचा विचार करून धोरण निर्णय

स्कूलचे फायदे :- 
- स्कूलमधील समाविष्ट विभागांच्या सहकार्याने संशोधनास गती येईल
- च्वाइस बेस क्रेडिट सिस्टीमनुसार विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य मिळेल.
- आंतरराष्ट्रीय संस्थांशी करार करताना स्कूल सिस्टिम असणे फायदेशीर

'विद्यापीठात स्कूल सिस्टिम असावी अशी शिफारस नॅकतर्फे करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय घेतला असून, शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या बदलामुळे ही निर्णय महत्त्वाचा आहे. समान हेतू असलेल्या विषयांच्या प्राध्यापकांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण होईल, संशोधनाच्या कामात मदत होईल. तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांशी करार करताना स्कूल सिस्टिम असणे खूप महत्त्वाचे आहे.'
- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, पुणे विद्यापीठ

'स्कूल'मध्ये जे समांतर विषय आहेत त्यांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. उदा. शारीरिक शिक्षण, शिक्षण, निरंतर शिक्षण या विभागांसाठी 'स्कूल ऑफ एज्युकेशन' स्थापन करण्यात आले. विभागांचे एकत्रीकरण झाल्याने प्रयोगशाळा, ग्रंथालय यासह इतर सुविधाही उपलब्ध होतील. प्रत्यक्ष शिक्षण सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना याचा अनुभव घेता येईल.'
- डॉ. संजीव सोनवणे, संचालक, स्कूल ऑफ एज्युकेशन

स्कूल' सिस्टीममुळे अधिकार व निर्णयांचे विकेंद्रीकरण झाल्याने विद्याशाखेला आवश्‍यकतेनुसार निर्णय घेता येईल. विद्यापीठाच्या अंदाजपत्रकात प्रत्येक स्कुलसाठी निधी उपलब्ध होणार असल्याने शैक्षणिक कामाचे व्यवस्थित नियोजन करता येईल. विद्यार्थी हे खरे याचे लाभार्थी असणार आहेत.'
- डॉ. आदित्य अभ्यंकर, संचालक स्कूल, ऑफ टेक्‍नॉलॉजी

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Drunk and Drive Crime : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम! तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाई

Latest Marathi News Live Update : शेळी चोरल्याच्या संशयातून १४ वर्षीय मुलाची हत्या

Baba Venga Prediction : इराण–इस्रायल–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगा यांची भविष्यवाणी चर्चेत

SCROLL FOR NEXT