Schools Reopen  sakal
पुणे

पुण्यातील शाळा बंदच राहणार, अजित पवारांच्या बैठकीनंतर मोठा निर्णय

ओमकार वाबळे

पुण्यातील शाळा बंदच राहणार असल्याची महत्वाची माहिती समोर येत आहे. राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू होत असून फक्त पुण्यातील शाळांसाठी स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

यामध्ये शाळांबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर शाळा बंदच राहणार आहेत. (Ajit Pawar speaks on schools) पर्यटनस्थळ, उद्याने, जलतरण तलाव यांबद्दल लवकरच नवी नियमावली जाहीर करणार असल्याची माहिती पवारांनी दि

शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात अद्याप शाळा सुरू करण्यास महापौरांनी नकार दिला दर्शवला. त्यानंतर पालकमंत्री अजित पवारांनी बैठक बोलावली. यामध्ये महत्वाची घोषणा झाली आहे. (Ajit pawar holds review meeting on schools reopen in pune)

कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्र्यांच्या कोरोना बैठकीत घेण्यात आला आहे. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सध्या राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी यासंदर्भात घोषणा केली.

परंतू, शाळांचा निर्णय स्थानिक पातळीवरील प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे. त्यानुसार पुण्याच्या महापौरांनी शाळा सुरू करण्यास नकार दर्शवला होता. यानंतर आज पालकमंत्री अजित पवारांच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. मागील चोवीस तासात पुण्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने सध्या शाळा फक्त ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवण्याची घोषणा झाली आहे. रुग्णसंख्या कमी होत नाही, तोपर्यंत ही नियमावली कायम राहणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. तसेच पुढील बैठकीत यासंदर्भात माहिती देणार असल्याचं ते म्हणाले.

पुण्यात चोवीस तासात सर्वाधिक रुग्ण

पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (ता.२१) दिवसभरात १६ हजार ६१८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात १० हजार १७७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. अन्य दहा रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील चार मृत्यू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT