नेदरलॅंडमधील आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायन्स सेंटर. याच धर्तीवर बारामतीतील सेंटरची उभारणी होणार आहे.
नेदरलॅंडमधील आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायन्स सेंटर. याच धर्तीवर बारामतीतील सेंटरची उभारणी होणार आहे. 
पुणे

बारामतीत सायन्स अँड इनोव्हेशन सेंटर

सकाळ वृत्तसेवा

माळेगाव - मुंबईतील नेहरू सायन्स सेंटरच्या धर्तीवर बारामतीत सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्‍टिव्हिटी सेंटरची उभारणी करण्यात येणार असून, त्याचे भूमिपूजन मंगळवारी होत आहे.

राज्य सरकारचा राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, कोलकाता येथील राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, तसेच मुंबईचे होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, टाटा ट्रस्ट आणि ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नाने या केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, राजीव गांधी सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी कमिशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, खासदार सुप्रिया सुळे, होमी भाभा सेंटरचे डॉ. सुब्रह्मण्यम, तसेच नेहरू सायन्स सेंटरचे डॉ. खिनिद आदी मान्यवरांच्या हस्ते मंगळवारी या केंद्राचे भूमिपूजन होणार आहे. 

विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पना विकसित व्हाव्यात, संशोधक वृत्ती वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने या केंद्राची उभारणी होत असल्याची माहिती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, सोनाली सस्ते, सूर्यकांत मुंढे यांनी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाकडे याबाबतचा प्रकल्प सादर केला होता. या सेंटरला सायन्स सेंटर न संबोधता सेंटर ऑफ एक्‍सलेन्स इन सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्‍टिव्हिटी असे म्हणावे, अटल टिंकरिंग प्रयोगशाळा, अटल इनक्‍युबेशन सेंटर यांना जोडूनच सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्‍टिव्हिटी सेंटरची उभारणी व्हावी, असे डॉ. काकोडकर यांनी सूचित केले होते.

हे तिन्ही प्रकल्प एकमेकांना पूरक असून अटल टिंकरिंग प्रयोगशाळा व सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्‍टिव्हिटी सेंटरमधून तयार झालेले विद्यार्थी अटल इनक्‍युबेशन सेंटरमध्ये अत्याधुनिक संशोधन करून नवउद्योजक होऊ शकतील. दैनंदिन गरजा पूर्ण करू शकेल व बाजारपेठेतील उत्पादनात रूपांतरित होऊ शकेल, अशा नावीन्यपूर्ण संशोधनाची मानसिकता शालेय जीवनापासूनच लहान मुलांमध्ये रुजवणे, कल्पनांना मूर्त स्वरूप देऊन संशोधन प्रत्यक्षात उतरविण्यासाठी हे प्रकल्प दुवा ठरतील, असे श्री. पवार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT