सायन्स सिटी, कोलकता - ‘एनसीसीएस’च्या प्रदर्शनात शालेय विद्यार्थ्यांना सूक्ष्मजीवांची माहिती देताना डॉ. महेश चवदार.
सायन्स सिटी, कोलकता - ‘एनसीसीएस’च्या प्रदर्शनात शालेय विद्यार्थ्यांना सूक्ष्मजीवांची माहिती देताना डॉ. महेश चवदार. 
पुणे

विज्ञान प्रदर्शनात पुण्याचा डंका

सम्राट कदम

पुणे - कोलकता येथील सायन्स सिटीमध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनात पुण्यातील चार संस्थांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये आघारकर इन्स्टिट्यूट, राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र (एनसीसीएस), राष्ट्रीय रेडिओ खगोलशास्त्र केंद्र (एनसीआरए) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डिझाइन अँड इनोव्हेशन सेंटर यांचा सहभाग आहे.

आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने गहू, तांदूळ, सोयाबीनच्या दर्जेदार प्रजाती; मासे आणि इतर जलीय प्रजातींना होणारे आजार यासंबंधीच्या माहितीचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. तसेच, काही सेकंदांत रक्तस्राव थांबविणाऱ्या ‘हिमो हाल्ट’ या पट्टिकेचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. प्रदर्शनात सहभागी डॉ. ज्युतिका राजवाडे म्हणाल्या, ‘‘या आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात आम्ही दरवर्षी सहभागी होतो. संस्थेच्या माहितीबरोबरच या विषयांसंबंधी काम करणाऱ्या संशोधकांची माहिती मिळते. बऱ्याचदा नंतर लोक संपर्क करून माहिती घेतात.’’

राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्राच्यावतीने नव्याने शोधण्यात आलेले सूक्ष्मजीवांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. तसेच, नव्याने शोधलेली बुरशी, जिवाणूंच्या प्रजाती आणि त्यांचा रहिवास, जीवनपद्धतीची माहिती देण्यात आली. प्रदर्शनात डॉ. महेश चवदार, डॉ. राहुल पाटील आणि भीमाशंकर उटगे आदींनी सहभाग नोंदवला.

विद्यापीठाच्या डझाइन अँड इनोव्हेशन सेंटरच्या वतीने जैविक खते आणि श्वासोच्छ्वासाचे परीक्षण घेणाऱ्या संयंत्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यामध्ये गोपालकुमार श्रीवास्तव, समता आढाव, अरुण आयनोडकर आणि संशोधक विद्यार्थी अजिंक्‍य तेरकर सहभागी झाले आहेत. तेरकर म्हणाले, ‘‘क्षारयुक्त आणि कोरडवाहू जमिनीमध्ये पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी आम्ही या खतांची निर्मिती केली आहे. जैविक घटकांपासून बनलेली ही खते पिकांना आवश्‍यक पोषणमूल्ये पुरवतात. ‘एनसीआरए’च्या वतीने स्क्वेअर किलोमीटर अरेचे प्रदर्शन भरविण्यात आले. प्रदर्शनात देशभरातील सर्वच संशोधन संस्थांनी सहभाग घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना संशोधन संस्थांच्या माहितीबरोबरच संशोधनाची सद्यःस्थिती लक्षात येते.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT