Turmeric
Turmeric Sakal
पुणे

हळदीच्या गुणधर्माला शास्त्रीय आधार

सम्राट कदम

पुणे - प्रत्येक भारतीयांच्या स्वयंपाकघरात हमखास सापडणार औषधी पदार्थ म्हणजे हळद! शरीरावरील जखमेपासून ते त्वचेच्या सौंदर्यासाठी हळद वर्षानुवर्षे वापरण्यात येते. आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान असलेल्या हळदीला आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर खरे उतरण्यासाठी जनुकीय क्रमनिर्धारण आवश्यक होते. ती गरज आता भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था भोपाळच्या (आयसर) शास्त्रज्ञांनी पूर्ण केली आहे. प्रथमच हळदीच्या डिएनएमधील ५० हजार ४०१ जनुकांचे क्रमनिर्धारण शास्त्रज्ञांनी पूर्ण केले आहे.

हळदीचे जगातील हे पहिले जनुकीय क्रमनिर्धारण असल्याचे आयसर भोपाळचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. विनीत शर्मा यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. त्यांच्या नेतृत्वात श्रुती महाजन, अभिषेक चक्रवर्ती, शुभम जैस्वाल यांनी हे संशोधन केले. या आधी गुळवेलाचेही जनुकीय क्रमनिर्धारण या गटाने केले होते. नेचरच्या कम्युनिकेशन बायॉलॉजी या शोधपत्रिकेत या संबंधीचा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. हळदीचे आयुर्वेदिक फायदे शास्त्रीय आधारावर सिद्ध करण्यासाठी या संशोधनाचा फायदा होणार आहे.

हळदीतील अनेक जनुके पर्यावरणीय ताणतणावांना प्रतिसाद म्हणून विकसित झाली आहेत. हळदीच्या जनुकीय क्रमनिर्धारणामुळे औषधनिर्माणशास्रातील संशोधनाला चालना मिळेल.

- डॉ. विनीत शर्मा, सहयोगी प्राध्यापक, आयसर भोपाळ

जनुकीय क्रमनिर्धारण

  • जगात प्रथमच हळदीच्या १७ प्रजातींचे जनुकीय क्रमनिर्धारण पूर्ण

  • १.०२ अब्ज बेस पेअर ज्यामध्ये १९ हजार ४७४ जनुकांचे निर्धारण

  • दुय्यम चयापचय, पेशीतील संदेश यंत्रणा, जैविक व अजैविक क्रियांतून उत्क्रांती उलगडण्यास मदत

  • प्रमुख औषधी संयुग ‘कर्क्यूमिनॉइड्स’च्या निर्मिती करणारे प्रमुख एन्झाईमची आनुवंशिक संरचना स्पष्ट

संशोधनाचे फायदे

  • उत्तम प्रतीच्या आयुर्वेदिक गुणधर्म असलेल्या प्रजातींची निवड करता येईल

  • उत्पादन आणि आयुर्वेदिक मूल्य वाढविण्यासाठी उपयोगी

  • विविध रोगांवरील उपयोग वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करता येईल

  • औषधांची निर्मिती आणि परिणामकारकता तपासता येणार

आयुर्वेदातील वापर

रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो, ही जंतुनाशक आहे. हृदविकार, मधुमेह, कर्करोग, मेंदूचे विकार होण्यापासून प्रतिबंध होतो. पचनक्रिया सुधारते. जखमेवर हळद लावल्यास रक्तस्राव बंद होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT