Dr. Vijay Bhatkar
Dr. Vijay Bhatkar Sakal
पुणे

Dr. Vijay Bhatkar : ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ आणि महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांना २०२४ चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा

Dr. Vijay Bhatkar : ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ आणि महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांना संगणकशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल २०२४ साठीचा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही घोषणा केली.

डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पुण्यभूषण पुरस्कारासाठी डॉ. भटकर यांची निवड केली आहे. पुरस्काराचे यंदा ३६ वे वर्ष आहे. यंदा या पुरस्काराची रक्कम एक लाख रुपयांवरून वाढवून दोन लाख रुपये करण्यात आली आहे. याशिवाय सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली बालशिवाजी महाराजांची प्रतिकृती आणि पुण्यभूषण स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे. तसेच यंदा या पुरस्कार सोहळ्यात सीमेवर कर्तव्य बजावत असताना जखमी झालेल्या चार जवानांचा आणि एका वीरमातेचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT